Tarun Bharat

भ्रमणध्वनी, दागिने चोरणाऱया बंगाली चोरटय़ांना अटक

कळंगूट पोलिसांची कारवाई, 3 लाखांचा माल जप्त

प्रतिनिधी /म्हापसा

कळंगूट पोलीस स्थानकाच्या हद्दीत आयफोन, भ्रमणध्वनी, सोनसाखळी पळविणाऱया बंगाली चोरटय़ांना पकडण्यात कळंगूट पोलिसांना यश आले आहे. कळंगूट पोलिसांनी त्या चोरटय़ावर पाळत ठेवून अवघ्या 24 तासाच्या आत तिघां चोरटय़ांना पकडण्यात यश मिळविले. अटक करण्यात आलेल्यामध्ये याहुद अली सरकार(20), अझीजुर रहमान सरकार (18) तसेच बप्पाराज मौला सरकार (19) या तिघां बंगाली तरुणांचा समावेश आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला 3 लाखांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. संशयित चोरटय़ांची रवानगी सध्या स्थानिक पोलीस कोठडीत करण्यात आल्याची माहिती कळंगुटचे पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी दिली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 27 जूनला तेलंगना येथील पर्यटक विजय श्रीनिवासलू यांच्याकडून आपण कळंगूट परिसरात असताना दोघां अपरिचित तसेच संशयित तरुणांनी जवळ येत आपल्या हातातील आयफोन, 13 किमती मोबाईल आणि 30 ग्रामची सोनसाखळी पळविल्याची रितसर तक्रार कळंगुटच्या पोलिसात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत कळंगूट पोलीस स्थानकाचे निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी संशयित चोरटय़ांचा मागोवा घेताना सहकारी पोलीस कर्मचाऱयांच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत चोरीची घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही पॅमेराच्या आधारे 24 तासाच्या आत तिघांही संशयित चोरटय़ांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले. दरम्यान चोरीस गेलेल्या एकूण 13 मोबाईल पैकी संशयित चोरटय़ांच्या ताब्यातील एकूण 4 मोबाईल सध्या पोलिसांकडून जप्त करण्यात आले असून आठ ग्रामची सोनसाखळी कडलेल्या अवस्थेत जप्त केली. लोकांनी परप्रांतीयांना भाडेपट्टीवर ठेवताना त्याची सीफॉर्म भरावी असे आवाहन निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी केले आहे.

Related Stories

कोलव्यात प्रवेशबंदी, अन्य समुद्रकिनाऱयांवर गर्दी

Amit Kulkarni

टोलटो ते धावजी फेरीसेवा अनियमित

Amit Kulkarni

सोणये – पालये तुयेत भरपावसात नळ कोरडे

Amit Kulkarni

आजगावकर, पाऊसकर अपात्रता याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल

Patil_p

ताळगांव येथे पंचायत गृह आवश्यक

tarunbharat

फोंडय़ात पोलीस अधिकाऱयावर प्राणघातक हल्ला

Patil_p
error: Content is protected !!