Tarun Bharat

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना सर्वोत्कृष्ट ‘जिल्हा रिटर्निंग ऑफिसर’ पुरस्कार

बेळगाव : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारतीय निवडणूक आयोगातर्फे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट “जिल्हा रिटर्निंग ऑफिसर” पुरस्कार बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना जाहीर झाला आहे.

भारतीय निवडणूक आयोग आणि कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने हा पुरस्कार जाहीर केला.

कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत उद्या बुधवारी दी 25 जानेवारी दुपारी 1 वाजता बेंगलोरच्या सर पुत्तन्ना चेट्टी टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या “राष्ट्रीय मतदार दिन” कार्यक्रमात नितेश पाटील यांना पुरस्कार प्रदान करणार आहेत.

यावेळी कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीना आणि बीबीएमपीचे मुख्य आयुक्त तुषार गिरीनाथ उपस्थित राहणार आहेत.

मतदार नोंदणी आणि पुनरिक्षण यासह एकूणच निवडणुकीतील सर्वोत्तम कामगिरी लक्षात घेऊन हा पुरस्कार दिला जातो.

त्याचप्रमाणे तुमकूर, यादगिरी आणि उडुपी जिल्ह्याच्या जिल्हा आयुक्तांनाही पुरस्कार देण्यात येत आहेत. याशिवाय विविध जिल्ह्यांतील निवडणूक निबंधक, सहाय्यक निबंधक, बूथ लेव्हल ऑफिसर, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि निवडणूक शाखेचे तांत्रिक कर्मचारी यांनाही स्वतंत्र श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर केले जातील.

Related Stories

केंद्रिय अर्थमंत्रालयाच्या कर विभागाकडून सतीश जाधव यांचा गौरव

Patil_p

चैतन्यमय वातावरणात पार पडली दौड

Patil_p

वडगाव येथील बालकाचा डेंग्यूने घेतला बळी

Tousif Mujawar

रस्त्यावर जलवाहिन्यांसाठी खोदाई

Amit Kulkarni

तालुक्यात प्लास्टिक विक्री करणाऱयांवर होणार कडक कारवाई

Patil_p

व्हाईस ऍडमिरल आर. हरीकुमार यांची सी-बर्ड नाविक दल प्रकल्पाला भेट

Amit Kulkarni