बेळगाव : हुनशाळ पी. जी. येथील सतीश शुगर्स लि. साखर कारखान्याला 2024 सालचा अत्युत्तम साखर कारखाना पुरस्कार देण्यात आला. दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनने हा पुरस्कार दिला आहे. उत्तमरीत्या चाललेला कारखाना, वीज प्रकल्प, डिस्टिलरी, कारखान्याचे उत्तम व्यवस्थापन, कार्यक्षमता आदी लक्षात घेऊन पुणे येथील दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनने 24 ऑगस्ट रोजी असोसिएशनचे अध्यक्ष एस. बी. भड व महाराष्ट्राचे मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते पुणे येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने विकास साधला आहे. चेअरमन व सीएफओ प्रदीपकुमार इंडी यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापन मंडळ, कामगार व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे हा पुरस्कार मिळाला आहे.
Previous Articleनिवडणूक विभाग नवमतदार नोंदीच्या कामात व्यस्त
Next Article शतकाचा इतिहास…पारंपरिक वाद्येच खास!
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.