मंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी आज टि्वटरवर पोस्ट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पुत्रावर निषाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांचे काम त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे सांभाळत आहेत. त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम चालु आहे अशी टिका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या मराठवाड्याच्य़ा दौऱ्यावर आहेत. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे बीड जिल्ह्यातील आष्टी येथेल रल्वेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी हजर आहेत. मुख्मंत्र्यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री कार्यालयाचे काम त्यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे करत असल्याचा फोटो व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्री कार्यालयातील खा. श्रीकांत शिंदे यांचा फोटो पोस्ट करत रविकांत वरपे यांनी खोचक टिका केली आहे. “खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा.
मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?” असे त्यांनी म्हटलंय.