उचगाव : खादरवाडी येथील मराठा मंडळ संचालित माध्यमिक विद्यालयातील क्रीडा शिक्षक पैलवान अतुल शिरोळे हे नागालँड येथे 1 ते 5 नोव्हेंबरदरम्यान दुसऱया खुल्या नागा कुस्ती चॅम्पयनशिप स्पर्धेसाठी दि. 31 ऑक्टोबर रोजी रवाना झाले. यानिमित्त बेळगाव तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्यावतीने त्यांचा सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या.
अतुल शिरोळे यांनी यापूर्वी जॉर्जिया व द. कोरियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. तुर्कस्तान येथील स्पर्धेतही त्यांनी चमकदार कामगिरी नोंदविली आहे. आता नागालँड येथील राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेमध्ये ते 90 किलो गटात खेळणार आहेत. नागालँड येथील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सर्व कर्मचारी आणि बेळगाव तालुका शारीरिक शिक्षणाधिकारी एस. बी. हंचनाळ, बाळेकुंद्री यांच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.