दर लागले कोसळू
प्रतिनिधी /मडगाव
गोव्यात यंदा सुपारीचे पीक वाढले आहे. त्यात व्यापाऱयांकडून सुपारीची उचल होत नसल्याने दर कोसळू लागले आहेत. गोव्यात सुपारीची सर्वाधिक खरेदी गोवा बागायतदार ही संस्था करीत असून संस्थेकडे मोठय़ा प्रमाणात सुपारी दाखल झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ऍड. नरेंद्र सावईकर यांनी दिली.
काणकोणपासून पेडणे पर्यंत गोव्यातील कुळागरांनी सुपारीचे पीक घेतले जाते. यंदा पीक वाढल्याने मोठय़ा प्रमाणात सुपारी सद्या गोवा बागायतदार संस्थेकडे दाखल झालेली आहे. सुपारीचे दोन प्रकार असतात, नवी सुपारी व जुनी सुपारी. त्यात जुन्या सुपारीला चांगला दर मिळतो तर नव्या सुपारीला मिळणारा दर देखील समाधान कारक असतो. यंदा गणेश चतुर्थीच्या काळात जुनी सुपारी 402 रूपये प्रति किलो पर्यंत पोचली होती. नंतर सुपारीचा दर कोसळू लागला. काल सोमवारी 380 रूपये प्रति किलो असा दर होता. नवीन सुपारीचा दर काल सोमवारी 311 रूपये प्रति किलो होता.
गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये सुपारीला चांगला दर मिळाला होता. सुपारी 500 रूपये प्रति किलोच्या घरात पोचली होती. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुपारीचा दर बराच कोसळला आहे. कोविड महामारीमुळे गेली दोन वर्षे अनेक शेतकऱयांनी सुपारी सोलून घेण्याचे टाळले होते. त्यामुळे बाजारात सुपारीची आवक कमी होती. ज्यांनी सुपारी सोलून घेतली. त्यांना चांगला दर मिळाला होता. मात्र. यंदा सुपारीची आवक प्रचंड असल्याने तसेच सुपारीचे चांगले पीक आल्याने दर कोसळू लागला आहे.
ऊसाला पर्याय म्हणून सुपारी व काजूची लागवड
गोव्यातील एकमेव संजीवनी साखर कारखाना बंद झाला असून तो पुन्हा सुरू होण्याची शाश्वती नसल्याने अनेक शेतकऱयांनी ऊस लागवड बंद करून त्या ठिकाणी सुपारी व काजूचे उत्पन्न घेण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे सुपारीच्या पीकात वाढ झालेली आहे. ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्राsत चांगले आहे. त्या ठिकाणी सुपारीची लागवड करण्यावर शेतकऱयांनी भर दिलेला आहे. ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता भासते अशा ठिकाणी काजूची लागवड केलेली आहे.
ऊसाला पर्याय म्हणून सुपारी व काजूची लागवड करण्याबरोबरच अनेक व्यावसायिक मोठय़ा प्रमाणात बागायती खरेदी करू लागले असून त्यांनी ही सुपारीच्या लागवडीवर भर दिलेला आहे. सुपारीच्या झाडाची लागवड केल्यानंतर जवळपास चार वर्षाने पीक मिळू लागते. नव्याने बागायती विकसित केल्या जात असल्याने पीकात वाढ झालेली आहे असे मत देखील नरेंद्र सावईकर यांनी व्यक्त केले आहे.
गोवा बागायतदार संस्थे बरोबरच अन्य व्यापारी देखील सुपारीची खरेदी करतात. पण, सद्या सुपारीची आवक वाढली आहे. पण, तशी उचल होत नसल्याने काहींशी समस्या निर्माण झालेली आहे. पाकिस्तान सारख्या देशाबरोबर भारताचे संबंध चांगले नाहीत. त्यामुळे पाकिस्तानकडून सुपारीची उचल अपेक्षित प्रमाणात होत नाही. इतर देशांनी सुपारीला तेव्हढी मागणी नाही. यामुळे सद्या सुपारीची उचल घटलेली आहे.