Tarun Bharat

केसरकरांची प्रवृत्तीच गद्दारीची – प्रवीण भोसले

Advertisements

सावंतवाडी/प्रतिनिधी-

आमदार दिपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर   केलेली टीका मुळीच खपवून घेतली जाणार नाही. पवारांनी तीन वेळा  शिवसेना  पक्ष फोडला हा केसरकर यांचा आरोप धादांत खोटा आहे.  उलट केसरकर यांच्यासारखी स्वार्थाने  पछाडलेली फुटीर प्रवृत्तीची मंडळी शिवसेनेत घुसल्याने शिवसेना पक्ष फुटला. अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवीण भोसले यांनी दीपक केसरकर यांच्यावर केली आहे.  केसरकर यांनी यापूर्वी शरद पवार यांच्यामुळे शिवसेना पक्ष फुटला असल्याचा आरोप करत  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे   शिवसेनेचे आमदार नाराज असल्याचे सांगितले होते. शिवसेनेचे आमदारांना राष्ट्रवादीकडून विकासकामांना निधी मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. याला भोसले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केसरकर यांची विश्वासघात  करण्याची वृत्ती आहे ते स्वार्थाने पछाडलेले व्यक्ती असून  ते स्वार्थासाठी कुणालाही दगाफटका देऊ शकतात. याचा अनुभव मला आला होता.मलाही त्याने दगाफटका दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे त्याना आमदार  केले. परंतु  त्यांनी स्वार्थासाठी  पक्षाशी गद्दारी करीत शिवसेनेत प्रवेश केला. तेथे आमदार झाले मंत्री झाले आता  विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष आहेत .या पदाला राज्यमंत्र्यांचा दर्जा आहेत. सिंधुरत्न योजने ते अध्यक्षही आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना ही पदे दिली. परंतु त्यांच्याशी गद्दारी करीत ते शिंदे गटात सामील झाले. केसरकर यांच्या  गद्दारी चे मला नवल वाटत नाही.  गद्दारी ही त्यांच्या रक्तातच आहे.  केसरकर हे आता मंद मंत्रिपदाच्या लालसेने  शिंदे गटाबराेबर  आसामात .गेले आहेत. परंतु त्यांनी महा विकास आघाडी सरकार उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कायम राहणार आहे  हे. ध्यानात ठेवावे जर मध्यावधी निवडणुका लागल्या तर  महा विकास आघाडीचा आमदार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून येणार आहे. केसरकर यांच्या गद्दारीला मतदार संघातील जनता कार्यकर्ते धडा शिकवतील असा विश्वासही भोसले यांनी व्यक्त केला.

Related Stories

आजही बरसणार मेघगर्जनसह जलधारा

Patil_p

रत्नागिरीत कारागृहातील पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

चिपळूणच्या शिरपेचात दोन मानाचे तुरे!

Patil_p

खेडमध्ये 2290 ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो!

Patil_p

वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास सर्वोच्च प्राधान्य

NIKHIL_N

नागरिकांना पेट्रोलने दिले महागाईचे चटके, दापोलीत पेट्रोल शंभरी पार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!