Tarun Bharat

भद्र पौर्णिमा माहात्म्य

येत्या शनिवार दि. 10 सप्टेंबर रोजी भद्र पौर्णिमा येत आहे. वैदिक कालगणनेनुसार पौर्णिमा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. प्रत्येक पौर्णिमेला काही ना काही महत्त्व आहे त्याचप्रमाणे भाद्रपद महिन्यामध्ये येणाऱया पौर्णिमेलाही विशेष महत्त्व आहे. या दिवसापासून पितृपक्ष सुरू होतो तो सर्वपित्री अमावास्येपर्यंत असतो. या काळात आपल्या पितरांच्या स्मरणार्थ काही धार्मिक विधी केले जातात. त्याचप्रमाणे या दिवशी सत्यनारायणाची पूजा केल्याने जीवनातील अकाली दुःखे दूर होऊन सुख, समृद्धी व शांती प्राप्त होते. वैदिक शास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितले आहेत पण त्याचबरोबर हेही सांगितले आहे की आपल्या जीवनात येणाऱया सर्व दुःखाचे कारण आहे अज्ञान. आणि हे अज्ञान दूर करण्यासाठी भगवंतांनी आपल्याला मनुष्य जन्म दिला आहे. त्यासाठी श्रीमद्भागवत या ग्रंथात वर्णन येते (भा 1.7.6) अनर्थोपशमं साक्षाद्भक्तियोगमधोक्ष लोकस्याजानतो विद्वांश्चपे सात्वतसंहिताम्। अर्थात ‘जीवांना नको असणारी दुःखे भक्तियोगाने क्षीण होतात, परंतु सामान्य लोक हे जाणत नाहीत, म्हणून विद्वान व्यासदेवांनी परम सत्यासंबंधी वेदवाङ्मयाची (सात्वत संहिता) रचना केली. याच श्रीमद्भगवतच्या 12 व्या स्कंधामध्ये वर्णन येते (भा 12.13.13) प्रौ÷पद्यां पौर्णमास्यां

हेमसिंहसमन्वितम् । ददाति यो भागवतं स याति परमां गतिम्। अर्थात ‘भाद्रपद पौर्णिमेला सुवर्णाच्या चौरंगासह भागवत ग्रंथाचे जो दान देतो त्याला परमगती लाभते’ भागवत हा सर्वश्रे÷ आध्यात्मिक ग्रंथ असल्यामुळे तो सुवर्णाच्या आसनावर ठेवणे योग्य आहे. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला सिंह राशीतील सूर्य एका सिंहासनावर आरूढ झाल्याप्रमाणे दिसतो. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीतील सूर्य उच्च समजला जातो. त्याचप्रमाणे श्रीमद्भागवत हे सर्व वैदिक ग्रंथांमध्ये सर्वश्रे÷ आहे. भागवत ज्ञानामृताचा महासागर आणि सर्वश्रे÷ ग्रंथ आहे. भागवताचे श्रद्धापूर्वक श्रवण, पठण आणि वितरण केल्याने अखिल विश्व पावन होते. विशेषतः

कलियुगातील लोकांसाठी चार वेद, उपनिषद, वेदांत सूत्र, मनुस्मृती इत्यादी वेदिक ग्रंथ समजणे कठीण आहे त्यासाठी महषी व्यासदेवाना त्यांचे गुरु नारदमुनींनी सर्व वेदांताचा सारांश म्हणून श्रीमद्भागवत लिहिण्यास सांगितले आणि हा भागवत ग्रंथ जो वाचतो आणि आपल्या जीवनात पालन करतो त्याला इतर कोणताही ग्रंथ वाचण्याची गरज नाही. (भा 12.13.15) सर्ववेदान्तसारं हि श्रीभागवतमिष्यते ।

तद्रसामृततृप्तस्य नान्यत्र स्याद्रतिः क्वचित्। अर्थात ‘भागवत सर्व वेदान्ताचे सार आहे. भागवत्कथामृताचे रसास्वादन केल्यावर मनुष्याला दुसऱया कोणत्याही ग्रंथाचे आकर्षण वाटत नाही’

धर्मतत्त्वांमध्ये चार प्रमुख विषयांचा समावेश असतो-धर्म, अर्थ, काम, मोक्ष. अधार्मिक जीवन हे रानटी अवस्थेतील जीवन आहे. वस्तुतः धर्माचे पालन करण्यापासूनच मनुष्य जीवनाची सुरुवात होते. केवळ मनुष्य शरीर असून उपयोग नाही तर मनुष्याची वृत्ती असणेही आवश्यक असते. पशुजीवनाची चार लक्षणे आहेत-आहार, निद्रा, भय आणि मैथुन. ही लक्षणे प्राण्यांना व मनुष्याना समान रूपाने लागू आहेत. परंतु धर्म हे मानवाचे एक असाधारण असे लक्षण आहे. धर्मरहित जीवन पशुजीवनाहून अधिक चांगले नाही. धर्म म्हणजे गीता आणि भागवत या दिव्य ग्रंथांमध्ये दिलेल्या नियमांचे पालन करणे. यासाठी तुकाराम महाराजही सांगतात. गीता-भागवत करिसी श्रवण। अखंड चिंतन विठोबाचे ।। अर्थात ‘प्रत्येकाने गीता-भागवत ग्रंथाचे दररोज श्रवण करावे आणि अखंड विठोबाचे नामस्मरण करावे,’

कलियुगातील लोकांकरिता खासकरून या भागवत ग्रंथाची रचना केली गेली आहे. याच भागवत ग्रंथामध्ये 5000 वर्षांपूर्वीच कलियुगात जन्म घेणाऱया लोकांचे विस्ताराने वर्णनही करण्यात आले आहे. थोडक्मयात सांगायचे तर भागवत कलियुगातील लोकांचे वर्णन करताना सांगते (भा 1.1.10) प्रायेणाल्पायुषः सभ्य कलावस्मिन् युगे जनाः । मन्दाः सुमन्दमतयो मन्दभाग्या ह्युपद्रुताः। अर्थात ‘कलियुग नामक या लोहयुगात लोक अल्पायुषी आहेत, भांडखोर आहेत, आळशी आहेत, मार्ग चुकलेले आहेत, दुर्दैवी आहेत आणि पूर्णपणे त्रासलेले आहेत’. कलियुगातील लोक अल्पायुषी आहेत याचे कारण अपुरे अन्न नसून, अनियमितपणाच्या सवयी आहेत. नियमित सवयी आणि साधे अन्न यांनी आपले आरोग्य सांभाळणे शक्मय आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक अन्न खाणे, अनावश्यक इंद्रियतृप्ती करणे, दुसऱयावर अनावश्यक अवलंबून राहणे आणि जीवनाचे कृत्रिम आदर्श यामुळे मनुष्याच्या जीवनशक्तीचाच नाश होतो. म्हणून कलियुगात मनुष्याचे आयुष्य कमी झाले आहे. या युगातले लोक पारमार्थिक आणि सांसारिक दृष्टीनेही आळशी झाले आहेत. मनुष्य जीवन हे आत्मसाक्षात्कारासाठी आहे. मी कोण आहे? हे जग काय आहे, कोण चालवते आहे? परम सत्य म्हणजे काय? अशा प्रश्नांची उत्तरे मनुष्याने शोधली पाहिजेत, त्यासाठीच हा जन्म आहे. या युगामध्ये लोक वेगवेगळे राजकीय पक्ष आणि पंथ यांच्या आहारी गेलेले आहेत. एवढेच नव्हे तर ते इंद्रियतृप्ती करविणाऱया पुष्कळ निरनिराळय़ा साधनांच्याही आहारी गेलेले आहेत. उदाहरणार्थ सिनेमा, खेळ, खेळाच्या स्पर्धा, जुगार, कुसंगती, धूम्रपान, मद्यपान, लबाडी, चोरी, भांडणे इत्यादी. त्यांची मने नेहमी अस्वथ आणि चिंतातूर असतात कारण त्यांचे अनेक उद्योग असतात. या युगामध्ये अनेक लोक आपले स्वतःचे असे धार्मिक पंथ

निर्माण करतात ज्यांना कोणत्याही प्रामाणिक शास्त्रांचा आधार नसतो. पुष्कळदा असे घडते की, इंद्रियतृप्तीच्या अधीन झालेल्या लोकांना अशा सांप्रदायाचे आकर्षण वाटते. म्हणून धर्माच्या नावाने इतकी पापकृत्ये केली जातात की सामान्य लोकांना मनाची शांती आणि शरीराचे आरोग्यदेखील लाभत नाही. यामुळे कलियुगातील सारे वातावरण अविश्वासाने भरून गेलेले आहे. पाश्चात्य राष्ट्राप्रमाणे भौतिक सुखे, इंद्रियोपभोग हाच संस्कृतीचा आदर्श मानला गेला आहे. अशा विकृत मूल्यांमुळे समाजाचा आध्यात्मिक स्तर उंचावणे फार कठीण झाले आहे.

त्यासाठी हा श्रीमद् भागवत ग्रंथ समाजाचे आध्यात्मिक स्तर उंचावण्यासाठी आणि समाजाला दिशा देण्यासाठीच व्यासदेवानी निर्माण केला आहे. त्यासाठी भागवतमध्ये म्हटले आहे (भा 1.3.43) कृष्णे स्वधामोपगते धर्मज्ञानादिभिः सह । कलौ नष्टद‍~ शामेष पुराणार्को।़धुनोदितः अर्थात ‘हे भागवत पुराण सूर्याप्रमाणे तेजस्वी असून भगवान श्रीकृष्णांनी स्वधामात गमन केल्यानंतर तात्काळ त्याचा उदय झालेला आहे. या कलियुगात अज्ञानरूपी निबिड अंधकाराने दृष्टीहीन झालेल्या लोकांना या पुराणापासून प्रकाश प्राप्त होईल.’

भगवान श्रीकृष्ण हे पतित जीवांच्या उद्धारासाठी आणि धर्मतत्त्वांची पुनःस्थापना करण्यासाठी अवतरित होतात. भगवंताशिवाय कोणीही धर्मतत्त्वांची स्थापना करू शकत नाहीत. खऱया धर्माचा अर्थ आहे परमेश्वराला जाणणे, त्यांच्याशी आपला संबंध काय आहे ते जाणणे, आणि त्यांच्याशी संबंधित अशी आपली कर्तव्ये कोणती आहेत आणि शेवटी, या जड शरीराचा त्याग केल्यावर काय गती होते ते जाणणे. सध्या आपण अज्ञानामध्ये जखडलो असल्याने आपल्याला ही जीवनाची तत्त्वे माहीत नाहीत. भगवान श्रीकृष्ण हे कलियुगाच्या आरंभापूर्वी नुकतेच प्रकट झाले होते आणि आगमनाच्या समयी ते आपल्या शाश्वत धामास परतले. आपल्या उपस्थितीत त्यांनी आपल्या कार्याद्वारे सर्व गोष्टी प्रकट केल्या. त्यांनी अर्जुनाच्या माध्यमातून भगवत गीतेचा संदेश दिला आणि कोणत्या धार्मिक तत्त्वांचे पालन करावे हे शिकवले. त्यानंतर त्यांनी व्यासदेवाना भागवत ग्रंथाची रचना करण्यासाठी शक्ती प्रदान केली. अशा प्रकारे, भगवत गीता आणि श्रीमद भागवत हे दोन्ही ग्रंथ या कलियुगात ज्ञानांध लोकांना ज्ञानप्रकाश देणारे दीपच आहेत. तात्पर्य हेच आहे की जरकलियुगातील जीवांना जीवनाचा खरा प्रकाश पाहण्याची इच्छा असेल तर त्यांनी केवळ या दोन ग्रंथांचे अध्ययन आणि अनुसरण करावे, म्हणजे मनुष्यजन्माचे सार्थक होईल. हे सर्व ध्यानात घेऊन भद्र पौर्णिमेला श्रीमद भागवत ग्रंथ आपल्या घरी आणावा, त्याचप्रमाणे त्याचे वितरणही करावे.

-वृंदावनदास

Related Stories

टक्केवारीतील तोकडी शिक्षण व्यवस्था

Patil_p

ज्ञानरत्ने

Patil_p

सीमाभाग केंद्रशासित करण्याच्या मागणीने लढय़ाला बळ!

Patil_p

शिव्या देणारी माणसे

Patil_p

स्वयंव्याधी निवारणाचा सिद्धांत

Patil_p

त्यांची ससेहोलपट टाळण्यासाठी…

Amit Kulkarni