Tarun Bharat

Maharashtra Train Accident: गोंदियात रेल्वेचा भीषण अपघात; ५० हून अधिक प्रवासी जखमी

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

गोंदियात रेल्वेचा भीषण (Gondia Train Accident) अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. रायपुरहून नागपूरच्या (Nagpur) दिशेने जाणाऱ्या भगत की कोठी (Bhagat ki Kothi) ट्रेनला हा अपघात झाला आहे. यात ५० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी प्रवाश्यांना उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. ही घटना आज पहाटे १ वाजता घडली आहे.

गोंदियात रेल्वेचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. रायपूरहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या भगत की कोठी या ट्रेनला गोंदियाजवळ हा अपघात झाला आहे. समोरून जात असलेल्या मालगाडीला भगत की कोठी या ट्रेनने धडक दिली. त्यामुळे या ट्रेनचा एक डबा घसरला आणि ५० जण जखमी झाले अशी माहिती समोर आली आहे. जखमी प्रवाशांना उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. ही घटना आज पहाटे १ वाजता घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समोरून जात असताना मालगाडीला भगत की कोठी ट्रेनने मागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात ५३ प्रवासी किरकोळ तर १३ जणांना थोडा मार लागल्याची माहिती आहे. हा अपघात रात्री उशिरा अडीचच्या सुमारास घडला. गोंदियादरम्यान मालगाडीला ट्रेनला सिग्नल न मिळाल्याने मागून ‘भगत की कोठी’ या पॅसेंजर ट्रेनने जोरदार धडक दिली आणि हा अपघात झाला. यात सुदैवाने एकाही प्रवाशाचा मृत झालेला नाही. ही अपघातग्रस्त ट्रेन छत्तीसगडमधील बिलासपूरहून राजस्थानमधील जोधपूरला जात होती.

Related Stories

परमबीर सिंह यांच्या घराबाहेर फरार असल्याची नोटीस

datta jadhav

संभाजीराजेंच्या दिल्लीतील सरकारी बंगल्यात शिरलं पाणी

Abhijeet Shinde

इचलकरंजीत समूह संसर्ग? 8 पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

धक्कादायक ! नाशिकमध्ये दोन बहिणींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Rohan_P

कोल्हापूर : ‘कोरोना’चे 6 बळी, 354 पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसाठी 750 कोटी देणार

Sumit Tambekar
error: Content is protected !!