Udayanraje Bhosale : राजकीय स्वार्थासाठी शिवरायांबाबत वक्तव्य केलं जातयं.निवडणुका आल्या की छत्रपती शिवाजी महाराजांच नाव वापरलं जातंय. महाराजांबाबत गलिच्छ प्रतीमा तयार केली जाते तेव्हा राग कसा येत नाही. आता जनतेनं विचार करणं गरजेचं आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना देशद्रोहाच्या कायद्यानुसार शिक्षा व्हावी अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. राज्यपालांच्या विधानावर शिवप्रेमी संघटनांशी चर्चा केल्यानंतर उदयनराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महाराजांविषयी बोलताना उदयनराजेंना भावना अनावर झाल्या.
यावेळी बोलताना उदयनराजें म्हणाले की, देशात सध्या सुरू असलेलं विकृतीकरण थांबवलं पाहिजे. महाराजांनी लोकशाहीची संकल्पना मांडली.महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीसमोर चुकीचा आणि खोटा जातोय.अपमानच करायचा आहे तर कशाला महाराजांचं नाव घेता.शिवजयंती साजरी तरी कशासाठी करायची.अपमान करणाऱ्यांवर कारवाई करत नसाल तर महाराजांचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असे खडे बोल सुनावत पक्षश्रेष्ठींकडून अशा लोकांवर कारवाईची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शासनाकडून अधिकृत असा महाराजांविषयी खंड प्रकाशित केला नाही, अशी नाराजीही व्यक्त केली.

