Sambhajirraje on Governor : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यात सर्व पक्षीय नेते आक्रमक झाले आहेत. भगत सिंह कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करावी या मागणीसाठी सरकारला धारेवर धरले आहे. आज पुन्हा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. राज्यकर्ते राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत आहे का? असा सवाल त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे.#कोश्यारी_हटाओ असा हॅश टॅग देत त्यांनी ट्विट केले आहे.
संभाजीराजे ट्विट करत काय म्हणाले.
भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही.कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच !#कोश्यारी_हटाओ असे ट्विट करत राज्यपाल पदावरून कोश्यारींना हटवण्याची मागणी केली आहे.
राज्यपालांचं छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य
‘शिवाजी महाराज जुन्या युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो आहेत, अस आक्षेपार्ह वक्तव्य राज्यपालांनी केलं.औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 62 व्या दीक्षांत समारंभ सोहळ्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं.
हेही वाचा- मी नाराज नाही; अब्दुल सत्तारांचे स्पष्टीकरण