नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांना मद्यपान करुन विमानात बसल्यामुळे विमानातून उतरविण्यात आले, असा आरोप होत आहे. या आरोपातील तथ्य केंद्र सरकार शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. नागरी विमानवाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी ही माहिती दिली. ही घटना जर्मनीत घडली आहे.
मान यांच्या मद्यपानामुळे जगात राज्याची मान खाली गेली आहे. जर्मनीत त्यांना मद्यपान केल्याने विमानातून उतरविण्यात आले. या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांनी केली होती. या मागणीला अनुसरुन सिंदिया यांनी केंद्र सरकारने या प्रकरणातील तथ्य तपासून पाहिले जाईल. तो पर्यंत केंद्र सरकार प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही, असे स्पष्ट केले. मान यांनी मद्यपान केल्याचा आरोप नाकारला आहे.