‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट
सलमान खानचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये अभिनेत्री भाग्यश्री आणि भूमिका चावला यांचा समावेश असणार आहे. या बिगबजेट चित्रपटाचे लवकरच चित्रिकरण सुरू होणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यशराज फिल्म्सकडून या चित्रपटाची निर्मिती होणार असल्याचे मानले जात आहे.
या चित्रपटात सलमान खान, जस्सी गिल, शहनाज गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम आणि विजेंदर सिंह यासारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान पुन्हा भाग्यश्री तसेच भूमिका चावला या अभिनेत्रींसोबत काम करणार आहे. सलमानने यापूर्वी भाग्यश्रीसोबत ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. तर सलमानने भूमिकासोबत ‘तेरे नाम’ चित्रपट केला होता. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. तर सलमानच्या आगामी चित्रपटात या दोन्ही अभिनेत्रींची महत्त्वाची भूमिका असणार आहे.