वार्ताहर /हरमल
खालचावाडा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात वर्षपद्धतीप्रमाणे दीड दिवसीय अखंड भजनी सप्ताह बुधवार 3 व गुरुवार 4 ऑगस्ट पर्यत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानिशी साजरा होणार आहे.
यानिमित्त दुपारी 12 वाजता श्री विठ्ठल रखुमाई मूर्तीची विधिवत स्थापना,तद्न?तर अवसारी कौल, आरती,तिर्थप्रासाद व अखंड भजनी सप्ताहास प्रारंभ होईल.रात्री 8 वाजता नागवेकर यांच्या निवासस्थानापासून दि?डीचे प्रस्थान वाटेत गात वाजत मंदिरात आगमन होते.गुरुवारी 4 रोजी सकाळी 8 वाजता धार्मिक विधी,अभिषेक, दुपारी कौल,आरती तिर्थप्रासाद संध्याकाळी 3 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमात विविध खेळ,दहीहंडी व श्रींची विसर्जन मिरवणूक होईलव अखंड भजनी सप्ताहाची सांगता होईल.तरी भाविकांनी उपस्थित राहून तिर्थप्रासादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष विश्राम तारी यांनी केले आहे.