ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भारत बायोटेकने तयार केलेल्या iNCOVACC या इंट्रानेजल लसीची किंमत निश्चित झाली आहे. 800 रुपये अधिक 5 टक्के GST अशी 1000 रुपये या लसीची किंमत असणार आहे. जानेवारी अखेरपर्यंत ही लस बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत बाजारात आलेल्या सर्व कोरोना लशी या इंजेक्शनद्वारे देण्यात येत होत्या. परंतु, आता भारत बायोटेकने नाकावाटे देण्यात येणारी लस तयार केली आहे. या लसीच्या बूस्टर डोसला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. या लसीची किंमतही आता कंपनीने जाहीर केली आहे. 800 रुपये अधिक 200 रुपये जीएसटी अशी 1000 रुपये या लसीची किंमत असणार आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ही लस बाजारात उपलब्ध होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अधिक वाचा : अधिवेशन काळात संसदेवरही मोर्चा काढणार, संयुक्त किसान मोर्चाचा इशारा
कॉवॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांना या लसीचा बूस्टर डोस घेता येणार आहे. सुरूवातीला ही लस खासगी लसीकरण केंद्रावर उपलब्ध होणार आहे.