Bharat Gawde as Executive President of State Marathi Teachers Association
महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भरत सडक गावडे यांची निवड करण्यात आली आहे. तर राज्य अध्यक्ष म्हणून वि ना लांडगे (सातारा), सचिवपदी पांडुरंग सुतार (सातारा), संपादकपदी गणेश रा देशपांडे (सोलापूर) यांची निवड करण्यात आली. अध्यापक संघाच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत एकमताने ही निवड करण्यात आली.
भरत गावडे १९९६ पासून गेली २६ वर्षे महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाच्या कार्यरत आहेत. या कार्यकाळात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने जिल्ह्यात तीन राज्यस्तरीय कृतीसत्रे आयोजित करून यशस्वी केली आहेत. मराठी भाषा समृद्धी व विकासासाठी शहरासह ग्रामीण भागात सातत्याने विविध उपक्रम राबवित असतात. सध्या ते मराठी भाषेचे तज्ञ मार्गदर्शक व साधनव्यक्ती म्हणून राज्यासह विभाग व जिल्हास्तरावर कार्यरत आहेत. राज्य व जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेत अनेक पारितोषिकेही त्यांनी पटकाविली.
ओटवणे / प्रतिनिधी