Tarun Bharat

सेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले; एकनाथ शिंदेंची ट्विट करत माहिती

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मंत्री एकनाथ शिंदेच्या(Eknath Shinde) बंडानंतर राज्यात वेगाने राजकीय हालचाली सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज सेना आमदारांची बैठक बोलावली होती. याबैठकीत मुख्यमंत्र्यांनी यापुढेही असेच सहकार्य असावे असे सूचक वक्तव्य केले. दरम्यान, बैठकीनंतर मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत बैठकीतील काही निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दिली.

शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य; यापुढे असेच सहकार्य राहू द्या

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा व्हीप बेयकदेशीर असल्याचे म्हंटले आहे. तसेच शिंदे गटाने सुनील प्रभू यांना प्रतोद पदावरून हटवून भारत गोगावले यांची शिवसेनेच्या विधिमंडळ प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली.

Related Stories

…तर हे पाऊल भारताला चुकीच्या वळणावर नेणार – अमेरिका

Sumit Tambekar

जुन्या झाडांना सेलीब्रिटी दर्जा द्या: अभिनेते सयाजी शिंदे

Abhijeet Shinde

नागठाणे येथील फिरस्ते परप्रांतीयांना मदतीचा हात

Patil_p

लसीकरणातील गोंधळ संपता संपेना

Patil_p

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 442 पोलिसांना कोरोनाची बाधा

Rohan_P

गडहिंग्लजमध्ये जुम्मा मशिदीत जमलेल्यांवर पोलिस कारवाई

Abhijeet Shinde
error: Content is protected !!