राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात सुरु आहे. या यात्रेचा कालचा चौथा दिवस होता.काल नांदेडमध्ये सभा झाल्यानंतर कार्यकर्त्यांना अपघात झाला. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या दोन जणांना आयशर टॅम्पोने धडक दिल्याने यात एकजण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. काल रात्री हि घटना घडली. महादेव पिंपळगाव याठिकाणी हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितूनुसार,
राहुल गांधी यांची काल सभा नवामुंडा मैदानात होता. या सभेला तमिळनाडू राज्यातून दोघे आले होते. सभा संपवून ते जात असताना अकोला नांदेड महामार्गाजवळील महादेव पिंपळगावाजवळ आयशर टॅम्पोने धडक दिली यात 62 वर्षीय गणेशन जागीच ठार झाले. तर त्यांचा साथीदार सायलू हा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात जाऊन जखमीची भेट घेतली.


previous post