अखिल भारतीय शैक्षिक महासंघाचा उपक्रम
प्रतिनिधी/कोल्हापूर
भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय शैक्षिक महासंघाच्या वतीने देशभरातील 1 लाख शाळांमध्ये भारतमाता प्रतिमा पूजन करण्यात येणार आहे. त्यापैकी 100 प्रतिमा कोल्हापूर जिल्हय़ासाठी आल्या आहेत, या प्रतिमांचे अनावरण जि. प. शिक्षणाधिकारी आशा उबाळे व महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष दस्तगीर मुजावर यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या धर्तीवर 1 ऑगस्ट रोजी देशभरातील 1 लाख शाळांमध्ये भारतमाता प्रतिमा पूजन केले जाणार आहे. त्यापैकी 100 प्रतिमा कोल्हापूर जिल्हय़ासाठी आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने या प्रतिमा शंभर शाळांना वाटप करण्यात येतील. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष दस्तगीर मुजावर, विभागीय अध्यक्ष अशोक आरंडे, शहर उपाध्यक्ष अमित वळवी , शहर कार्याध्यक्ष अभिजीत साळोखे, शहर सचिव रवींद्र नाईक, दत्तात्रय मगदूम व संघटनेचे नेते राजेंद्र कोरे आदी उपस्थित होते.
हे ही वाचा : मिशन ऍडमिशन! आयटीआयची तात्पुरती गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर होणार