Tarun Bharat

भारत-बांगलादेश सामन्याच्या ठिकाणात बदल

Advertisements

वृत्तसंस्था/ ढाका

पुढील महिन्यात होणाऱया भारत आणि यजमान बांगलादेश यांच्यातील वनडे सामना ढाक्मयामध्ये खेळविला जाणार होता. दरम्यान, या सामन्याच्या दिवशी देशाच्या विरोधी पक्षाने बंदचा आदेश दिल्याने या सामन्याचे ठिकाण बदलले आहे.

2015 नंतर भारतीय क्रिकेट संघ पहिल्यांदाच बांगलादेशच्या दौऱयावर जाणार आहे. पुढील आठवडय़ात भारतीय संघ बांगलादेशमध्ये दाखल होईल. उभय संघांमधील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 4 डिसेंबरपासून प्रारंभ होईल. या मालिकेतील सर्व म्हणजे तिन्ही सामने सुरुवातीला ढाक्मयामध्ये खेळविण्याचा निर्णय घेतला होता. पण आता या मालिकेतील 10 डिसेंबर रोजी होणारा तिसरा सामना ढाक्मयाऐवजी चितगाँग येथे खेळविला जाईल, असे क्रिकेट बांगलादेशच्या प्रवक्त्याने सांगितले. या दौऱयामध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना चितगाँगमध्ये 14 ते 18 डिसेंबर तर दुसरा सामना 22 ते 26 डिसेंबर दरम्यान ढाका येथे खेळविला जाईल.

Related Stories

आरपी सिंगच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन

Patil_p

मुंबई-उत्तरप्रदेश रणजी उपांत्य लढत आजपासून

Patil_p

सराव सुरु करण्याबाबत दिशानिर्देश द्यावेत

Patil_p

पावसाळय़ानंतरच क्रिकेटची शक्यता : राहुल जोहरी

Patil_p

नदाल, मेदवेदेव्ह, प्लिस्कोव्हा, हॅलेपची आगेकूच

Patil_p

टी-20 चा वर्ल्डकप हेच ट्वेन्टी-20 चे लक्ष्य!

Patil_p
error: Content is protected !!