प्रतिनिधी /बेळगाव
भरतेश एज्युकेशन ट्रस्टतर्फे गुरुवार दि. 25 रोजी रोबो क्रांती व 75 रोबोंची सलामी अशा संयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रुपाली कन्व्हेंशन हॉल येथे इयत्ता सहावी ते इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम असणार आहे. आझादी का अमृतमहोत्सवानिमित्त एकाच वेळी 75 रोबोट तिरंगा घेऊन संचलन करणार आहेत. याची इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची शक्मयता संस्थेचे उपाध्यक्ष राजीव दोड्डण्णावर यांनी व्यक्त केली.
सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. बेळगाव जिल्हय़ातील सर्व 75 अटल टिंकरिंग लॅब तसेच अन्य शाळांमधील विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये रोबोटिक टेक्नॉलॉजीबद्दल माहिती व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रोबो क्रांतीमध्ये 60 शाळांमधील 160 संघ सहभागी होणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 15 हजार, 10 हजार, 5 हजार रुपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. त्याशिवाय स्कूल चॅम्पियनशीप ऍवॉर्ड म्हणून एका शाळेला ड्रोन बक्षिसादाखल दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी शांती फॉमॅकचे अध्यक्ष संतोष पोरवाल, बेंगळूर येथील इस्त्राsचे माजी ग्रुप संचालक सुनीलकुमार, सुमन पंडित, मुख्याध्यापक एम. एम. सिंधूर उपस्थित राहणार आहेत. बेळगावमधील विविध कॉलेजचे प्राध्यापक स्पर्धेचे परीक्षण करणार असल्याची माहिती दोड्डण्णावर यांनी दिली. यावेळी सेपेटरी श्रीपाल खेमलापुरे, हिराचंद कलमनी यासह इतर उपस्थित होते.