Tarun Bharat

Sangli : भारती दिगडे यांनी स्विकारला सभागृह नेतेपदाचा पदभार; सर्व सदस्यांनी दिल्या शुभेच्छा

Advertisements

सांगली : भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका भारती दिगडे यांची महापालिकेच्या सभागृह नेतेपदी निवड झाल्यानंतर आज सोमवारी दिगडे यांनी महापालिकेतील कार्यालयात जाऊन आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी सुद्धा भारती दिगडे यांना शुभेच्छा दिल्या तर महापालिका कर्मचाऱ्यांकडून भारती दिगडे यांचा सत्कार करण्यात आला.

सभागृह नेते पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भारती दिगडे यांचा प्रथम मनपा प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला. यावेळी उपायुक्त चंद्रकांत आडके, सहायक आयुक्त नितीन शिंदे, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, सर्जेराव काळोसे, दिगंबर सुर्यवंशी, स्वीय सहायक दीपक अस्वले, स्नेहराज कांबळे यांच्यासह मनपा कर्मचारी उपस्थित होते. तसेच स्थायी सभापती धीरज सुर्यवंशी, राष्ट्रवादीचे गटनेते मेनुद्दीन बागवान, माजी विरोधीपक्ष नेते उत्तम साखळकर, नगरसेवक संतोष पाटील, मंगेश चव्हाण यांनीही भारती दिगडे यांचा सत्कार केला तर मनपा महिला कर्मचारी यांनीही भारती दिगडे यांचा सत्कार करत स्वागत केले.
यावेळी बोलताना भारती दिगडे यांनी नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून कामकाज करण्याबाबत सांगितले तसेच नागरी प्रश्नांना अधिक प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.

Related Stories

सांगली : तासगावात कोरोनाने पुन्हा तिघांचा बळी

Archana Banage

सांगली : भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन ही लोकशाहीची गळचेपी – जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख

Archana Banage

अनिकेत कोथळे खूनप्रकरण : अमोल भंडारे याच्या सहा जबाबात अनेक विसंगती

Archana Banage

सांगली शहर युवक काँग्रेसची नुतन कार्यकारणी जाहीर

Archana Banage

सांगली : मिरजेत साडेतीन लाखांचा सुगंधी तंबाखू, गुटखा जप्त

Archana Banage

सांगली : लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर घरीच उपचार शक्य

Archana Banage
error: Content is protected !!