Tarun Bharat

भारती विद्याभवन, गोमटेश विजेते, बालिका आदर्शला दुहेरी मुकुट

Advertisements

टिळकवाडी विभागीय माध्यमिक क्रीडा स्पर्धा : व्हॉलीबॉलमध्ये ठळकवाडी हायस्कूल, डीपी तर कबड्डीत गोमटेश, स्वाध्याय विद्या मंदिर उपजेते

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

सार्वजनिक शिक्षण खाते व भारती विद्याभवन स्कूल आयोजित टिळकवाडी विभागीय क्रीडा स्पर्धेत बुधवारी झालेल्या व्हॉलिबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात गोमटेश हायस्कूलने ठळकवाडी हायस्कूलचा 2-1 तर मुलींच्या गटात बालिका आदर्शने डीपीचा 2-0 असा आणि कब्बड्डी स्पर्धेत मुलांमध्ये भारती विद्याभवन संघाने गोमटेश इंग्रजी माध्यम संघाचा तर मुलींमध्ये बालिका आदर्श संघाने स्वाध्याय विद्या मंदिर संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले.

केएलएस स्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या व्हॉलिबॉल स्पर्धेत मुलींच्या पहिल्या उपांत्य सामन्यात बालिका आदर्श संघाने गोमटेश मराठी संघाचा 15-12, 15-10 तर दुसऱया उपांत्य सामन्यात डीपी संघाने गोमटेश इंग्लिश संघाचा 15-11, 15-8 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात बालिका आदर्श संघाने डीपी संघाचा 25-17, 25-20 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. मुलांच्या गटात ठळकवाडी हायस्कूल संघाने गोमटेश मराठी संघाचा 2-0 तर गोमटेश इंग्रजी माध्यम संघाने एसव्हीएम संघाचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात गोमटेश इंग्रजी माध्यम संघाने ठळकवाडी संघाचा 25-18, 20-25, 15-11 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.

कब्बड्डी स्पर्धेत मुलींच्या उपांत्य सामन्यात बालिका आदर्श संघाने तात्यासाहेब मुसळे संघाचा 23-4 तर दुसऱया उपांत्य सामन्यात स्वाध्याय विद्या मंदिर संघाने व्ही. एन. शानभाग संघाचा 16-11 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात बालिका आदर्शने स्वाध्याय विद्या मंदिरचा 24-1 अशा गुणफरकाने पराभव करून जेतेपद पटकावले. मुलांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात गोमटेशने एसव्हीएम संघाचा 12-8 तर दुसऱया सामन्यात भारती विद्याभवनने गोमटेश मराठी संघाचा 8-4 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात भारती विद्याभवनने गोमटेश इंग्रजी माध्यम संघाचा 13-4 अशा गुणफरकाने पराभव करीत जेतेपद मिळविले. या स्पर्धेसाठी रामलिंग परिट, प्रवीण पाटील, एच. बी. पाटील, सोलोमोन, उमेश बेळगुंदकर, देवकुमार मंगणाकर, संतोष दळवी, प्रसाद, सिल्व्हीया डिमेलो, उमेश मजुकर, श्रीहरी लाड यांनी पंचांचे काम पाहिले.

Related Stories

सदलग्यात दोन दिवसात कोवीड सेंटर सुरू करणार

Patil_p

लॉकडाऊनबाबत अनगोळ येथील बैठक निर्णयाविना

Rohan_P

‘आम्ही जातो आमच्या गावा’…..

Patil_p

आनंदवाडी आखाडय़ात रविवारी आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे आयोजन

Amit Kulkarni

जीनोमिक सिक्वेन्सिंग लॅबची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील : मुख्यमंत्री बोम्माई

Sumit Tambekar

विश्रुत चिट्सचे चंदन कुंदरनाड बीपीएलचे दुसरे संघमालक

Amit Kulkarni
error: Content is protected !!