Tarun Bharat

भाऊ कदम-भारत गणेशपुरे 3 रोजी बेळगावात

राजू पवार डान्स अकॅडमीतर्फे होणार कॉमेडी शो

प्रतिनिधी /बेळगाव

राजू पवार डान्स अकॅडमीच्यावतीने रविवार दि. 3 जुलै रोजी कॉमेडी शोचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वा. नेहरूनगर येथील जेएनएमसी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात ‘चला हवा येऊ द्या’ फेम विनोदी कलाकार भाऊ कदम व भारत गणेशपुरे यांचा कॉमेडी शो होणार आहे. या कार्यक्रमात कोरोना काळामध्ये उत्तम सेवा बजावलेल्या डॉक्टर, पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाणार आहे. हा चॅरिटेबल शो असून, कॅम्प पुरोहित व हॉटेल सन्मान येथे तिकीट विक्री केली जात आहे. अधिक माहितीसाठी 0831-2428324 व 0831-2477077 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राजू पवार डान्स अकॅडमी मागील 30 वर्षांपासून बेळगावमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करीत आहे. यापूर्वी मराठी-हिंदी चित्रपट व मालिकांमधील कलाकारांना बेळगावमध्ये आणण्यात आले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, पद्मिनी कोल्हापुरे, हास्य कलाकार अली असगर, मकरंद अनासपुरे, दिपाली सय्यद, क्रांती रेडकर, प्रिया बेर्डे, जॉनी लिव्हर या कलाकारांना बेळगावमध्ये आणून त्यांनी विविध कार्यक्रम केले आहेत. डॉ. विजय देसाई यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे. 

Related Stories

आदर्शनगर येथे हजारो लिटर पाणी वाया : दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

तालुक्यात हुतात्मादिन संदर्भात जनजागृती

Amit Kulkarni

टोळक्याने एका इसमावर अचानक केला जीवघेणा हल्ला

mithun mane

मोदेकोप येथील गॅस्ट्रोची लागण झालेल्यांची प्रकृती स्थिर

Amit Kulkarni

घरांना मंजुरी पण निधीचा अभाव

Omkar B

निपाणी, संकेश्वरमधील 14 जण झाले कोरोनामुक्त

Patil_p