मालवण/प्रतिनिधी-
दांडी येथील श्री देव चौकचार श्रीकृष्ण मंदिर येथे आषाढी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त दांडी समुद्रकिनारी विठ्ठल नामाच्या गजरात वाजतगाजत भव्य दिंडी काढण्यात आली. दिंडीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.