Tarun Bharat

राष्ट्रकुल फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भवानी देवीला सुवर्ण

Advertisements

सलग दुसऱयांदा जेतेपद मिळविण्याचा पराक्रम

वृत्तसंस्था/ लंडन

भारताची महिला समशेरबाज भवानी देवीने येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक स्वतःकडेच राखले. या स्पर्धेच्या मागील आवृत्तीतही तिने सुवर्ण पटकावले होते.

42 व्या मानांकित भवानी देवीने वरिष्ठ महिला सेबर वैयक्तिक प्रकारात ऑस्ट्रेलियाच्या द्वितीय मानांकित व्हेरोनिका व्हॅसिलेव्हाचा अंतिम फेरीत 15-10 असा पराभव करून जेतेपद पटकावले. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय समशेरबाज बनल्यानंतर या क्रीडा प्रकारात तिची हळूहळू प्रगती सुरू आहे. यावर्षी इस्तंबुलमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत तिने 23 वे स्थान मिळविले. त्यानंतर जुलैमध्ये कैरोत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिचे आव्हान दुसऱया फेरीत समाप्त झाले. राष्ट्रकुल फेन्सिंग चॅम्पियनशिप ही तिची या वर्षातील दहावी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे.

येथे सुवर्ण जिंकल्यानंतर बोलताना ती म्हणाली की, ‘अतिशय अवघड अंतिम लढत होती, पण त्यात मी यशस्वी ठरले आणि भारताला या वर्षात आणखी एक सुवर्ण जिंकून देता आले याचे मला खूप समाधान वाटते. या वर्षात माझा समाधानकारक प्रवास झाला असून यापुढेही हा जोम कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल. देशातही मला चांगले पाठबळ मिळाले, याचा आनंद आहे.’

भवानी देवी ही फेन्सिंगमधील भारताची मशालधारक असल्याचे भारतीय फेन्सिंग  संघटनेचे सरचिटणीस राजीव मेहता यांना वाटते. ‘भारतातील सर्व समशेरबाजांसाठी ती प्रेरणास्थान बनली आहे. तिच्यामुळेच आता अनेक युवा समशेरबाज जागतिक स्तरावर ठसा उमटवण्याची स्वप्ने पाहू लागले आहेत. येथील स्पर्धेत तिने सुवर्ण मिळवित भारतात हा क्रीडा प्रकार वाढीस लागल्याचा आमचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. भविष्यात भारतात अनेक समशेरबाज निर्माण होत ऑलिम्पिकसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत नियमितपणे भारताची ताकद दाखवतील, याची मला खात्री वाटते,’ असे ते म्हणाले.

Related Stories

विंबल्डन स्पर्धेतून नील्सन बाहेर

Patil_p

फुटबॉलपटू रॅमोस कोरोना बाधित

Patil_p

व्हॅलेन्सियाची फुटबॉल क्षेत्रातून निवृत्ती

Amit Kulkarni

ऑस्ट्रेलियाचा पुकोवस्की दुखापतीमुळे बाहेर

Amit Kulkarni

कृणाल पंडय़ाला पुत्ररत्न

Patil_p

पीव्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p
error: Content is protected !!