Tarun Bharat

आंबेवाडी येथील भावकेश्वरी यात्रा 26 रोजी

दोन वर्षांनंतर भरयात्रा, शिस्तबद्ध पार्किंगचे आवाहन

प्रतिनिधी/ बेळगाव

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे गावात यात्रोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आले. विधिवत पूजाअर्चा करून अनेक यात्रा करण्यात आल्या. मात्र आता कोरोना नियंत्रणात आल्याने यावषी आंबेवाडी (ता. बेळगाव) येथील ग्रामस्थांनी श्री भावकेश्वरी यात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार दि. 26 रोजी ही यात्रा भरविण्यात आली आहे.

मागील दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुरामुळे आंबेवाडी (ता. बेळगाव) येथील मुख्य रस्ता वाहून गेला होता. त्या रस्त्याची डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. मात्र गावात प्रवेश करण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. हाच रस्ता अर्धवट असल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. सध्या आंबेवाडी गावातील मुख्य रस्ताही अर्धवट करण्यात आल्याने रहदारीची कोंडी होण्याची शक्मयता आहे. तेव्हा रस्त्याच्या मध्येच वाहने पार्किंग न करता बाजूला लावावीत, असे आवाहनही श्री घळगेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीने केले आहे.

सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन

महिनाभरापूर्वी श्री भावकेश्वरी मंदिरात गाऱहाणे घालण्यात आले होते. आता मंगळवार दि. 26 रोजी हे गाऱहाणे उतरविण्यात येणार आहेत. त्यानंतर देवीची विधिवत पूजाअर्चा करून यात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. दरम्यान मंगळवार व बुधवार असे दोन दिवस यात्रेनिमित्त गर्दी होणार आहे. तेव्हा रहदारीला अडथळा होऊ नये यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही देवस्थान पंच कमिटीने केले आहे.

Related Stories

कडोली येथे 38 व्या मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

mithun mane

लॉकडाऊनमुळे काजू उत्पादक शेतकरी अडचणीत

Patil_p

कॅन्टोन्मेंटची सर्वसाधारण सभा उद्या

Amit Kulkarni

कारागृहात साक्षरता कार्यक्रम

Amit Kulkarni

20 वाहने जप्त; विनामास्क फिरणाऱया 290 जणांवर गुन्हा

Amit Kulkarni

धामणे भागात पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली

Amit Kulkarni