Tarun Bharat

भिडे गुरुजींची उचगावला धावती भेट

उचगाव : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी सोमवारी रात्री उचगावला धावती भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारुढ शिवमूर्तीचे दर्शन घेतले. येथे महाराजांची भव्यदिव्य मूर्ती स्थापन केल्याबद्दल शिवभक्तांचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले.

सोमवार दि. 26 सप्टेंबर म्हणजेच घटस्थापनेपासून दुर्गामाता दौड मोठय़ा प्रमाणात भरविण्याचा संकल्प भिडे गुरुजींसमोर उचगाव शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान  शाखेच्यावतीने करण्यात आला.

यावेळी भिडे गुरुजी यांने, किल्ले रायगड येथे पूणर्स्थापित केल्या जाणाऱया सुवर्ण सिंहासनासाठी शिवभक्तांनी सढळ हस्ते कर्तव्य निधी द्यावा. या सुवर्ण सिंहासनाच्या संरक्षणाबाबत खडा पहारा उपक्रमासाठी उचगाव व परिसरातून कार्यकर्ते तयार व्हावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भिडे गुरुजींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

Related Stories

डॉ. श्रीकृष्ण देशमुख महाराज यांची कोगनोळीस भेट

Omkar B

बेळगावच्या विमानसेवेला घरघर

Amit Kulkarni

येळ्ळूर विभाग म. ए.समितीतर्फे सत्कार

Patil_p

मतपत्रिकेद्वारेच मतदान घेण्याची मागणी

Amit Kulkarni

गणेशोत्सवा संदर्भात शांतता समिती बैठक

Patil_p

उचगाव मळेकरणी यात्रा आजपासून बंद

Amit Kulkarni