बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी सोमवारी अनगोळ येथील गणेशोत्सव मंडळांना भेट दिली. ते हेब्बाळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी अनगोळ येथे जाऊन गणेशोत्सव मंडळांना भेट दिली.
धर्मवीर संभाजी चौक, रघुनाथपेठ, येथील सुवर्णमहोत्सवी गणेशाचे दर्शन तसेच बालगणेश उत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. गुरुजींच्या हस्ते गणपतीची आरती झाली. त्यांनी रायगडावरील सुवर्णसिंहासनाबद्दल माहिती दिली. अखंड जागता पहारा ठेवण्यासंदर्भातही मार्गदर्शन केले. शिवकार्यात सहभागी होणाऱया युवकांनी आपले नाव नोंदवावे, असे आवाहन केले. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख किरण गावडे, पुंडलिक चव्हाण, मंडळाचे मार्गदर्शक गजानन चौगुले, भाऊ कावळे, रमेश शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.