Tarun Bharat

आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरात ‘भीम ज्योत यात्रा’

प्रतिनिधी /बेळगाव

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (अभाविप) बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला बेळगाव शहरातून ‘भीम ज्योत यात्रा’ काढण्यात आली. हिंदवाडी येथील गोमटेश विद्यापीठापासून आरपीडी चौकमार्गे गोवावेस येथील बसवेश्वर उद्यानापर्यंत मशाल पदयात्रा काढण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे युवकांसाठी प्रेरणादायी असल्यामुळे अभाविपने भीम ज्योत यात्रा काढली. विद्यार्थ्यांनी घोषणा देत आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कृष्णा कामत, अभाविपचे शहर अध्यक्ष डॉ. एस. व्ही. घोरबाळ, सचिव कृष्णकुमार जोशी, राज्य कार्यकारिणीचे सहसचिव रोहित उमनाबादीमठ, सुरेश जंगुनी यांसह अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

खानापूर बकरी बाजारात चार-पाच कोटींची उलाढाल

Amit Kulkarni

प्रशासकीय काळात ग्रा.पं.सदस्यांची गरज नाही

Omkar B

अन्नभाग्य योजनेचा 12 लाखाचा तांदूळ जप्त

Patil_p

मराठी टिचर्स ट्रेनिंग कॉलेजतर्फे नूतन प्राचार्यांचा सत्कार

Amit Kulkarni

वडगाव येथे घराला आग

Patil_p

अनगोळ येथील युवक बेपत्ता

Amit Kulkarni