Tarun Bharat

भोगावतीने ऊसदर जाहीर करुन गळीत हंगाम वेळेत चालू करावा- स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील

मागिल २०० रुपयांसह ६४ महिन्यांची सभासद साखर देण्याची मागणी

भोगावती / प्रतिनिधी

भोगावती सहकारी साखर कारखान्याने सन २०२२/२३ च्या ऊस गळीत हंगामातील एकरकमी एफ आर पी चा ऊसदर रुपये ३१२४ जाहीर करावा.तसेच मागिल देय प्रतिटन रुपये २०० चा हफ्ता व ६४ महिन्यांची सभासद साखर ताबडतोब देऊन यावर्षीचा ऊस गळीत हंगाम वेळेत चालू करावा.अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने एका लेखी निवेदनाद्वारे कारखाना प्रशासनाकडे केली असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी बुधवारी दिली.

भोगावतीने यावर्षीचा ऊसदर अद्यापही जाहीर केलेला नाही.चालू ऊसगळीत हंगामातील ऊसदरासाठी गतवर्षीचा सरासरी साखर उतारा १२.५० टक्के आहे. त्यानुसार ऊस तोडणी व वाहतूक खर्च रुपये ५९४ वजा करून प्रतिटन रुपये ३१२४ ऊसदर बसतो.म्हणून यावर्षीच्या एफ आर पी प्रमाणे प्रतिटन ३१२४ रुपये ऊसदराचा एकरकमी पहिला हफ्ता जाहीर करावा व यावर्षीचा ऊसगळीत हंगाम वेळेत चालू करावा.कारण आपलेच हितचिंतक आपला ऊस भोगावती ऐवजी अन्य साखर कारखान्याला पाठवत आहेत. त्याचीही चौकशी करावी.अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच मागिल प्रतिटन २०० रुपये व सभासदांची गेल्या ६४ महिन्यातील सवलत साखर ताबडतोब द्यावी अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांच्या हस्ते मागण्यांचे निवेदन प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील यांना देण्यात आले.यावेळी कारखान्याचे शेती अधिकारी शत्रुघ्न पाटील व प्रभारी कार्यालय प्रमुख सुरेश कांबळे उपस्थित होते.मागण्यांची पुर्तता यावर्षीच्या ऊस गळीत हंगाम शुभारंभापुर्वी करावी.अन्यथा ऊसतोड बंद आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.निवेदन देण्यासाठी भेटलेल्या शिष्टमंडळात जनार्दन पाटील यांच्यासह आण्णाप्पा चौगले,विलास पाटील, रंगराव पाटील, रावसाहेब डोंगळे,साताप्पा पाटील, शामराव टिपूगडे,तुकाराम सुतार,कृष्णात मोगणे आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Related Stories

कोरोना, महापुराचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे : आ. पी एन पाटील

Archana Banage

दलित महासंघाच्या जिल्हा संघटकपदी अशोक गायकवाड

Archana Banage

काळम्मावाडी धरण ९८.२०टक्के भरले, ४६०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू

Archana Banage

जिंकणं आणि हारणं हे महाडिकांचं संकट नव्हे : महादेवराव महाडिक

Archana Banage

शिवसेना फुटीचा सेनेसह आबिटकर, मंडलिकांना फटका

Kalyani Amanagi

बेकरीच्या काऊंटरमधून रोकड लंपास

Archana Banage