Tarun Bharat

बांयगिणी कचरा प्रकल्पाची निविदा दोन महिन्यांत

Advertisements

कचरा व्यवस्थापनमंत्री मोन्सेरात यांची माहिती

प्रतिनिधी /पणजी

बांयगिणी येथील नियोजित घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची निविदा येत्या दोन महिन्यांत काढण्यात येईल, अशी माहिती कचरा व्यवस्थापनमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी दिली. काल मंगळवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 आमदाराच्या विरोधाचा प्रश्नच नाही

हा प्रकल्प होणे काळाची गरज असून त्या दिशेने काम सुरू आहे. या प्रकल्पाशी संबंधित आवश्यक त्या कायदेशीर सर्व मान्यता सरकारने मिळविल्या आहेत. न्यायालयाकडूनही सर्व मंजुरी मिळाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक आमदाराच्या विरोधाचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे मोन्सेरात म्हणाले.

हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. परंतु प्रकल्पास कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही प्रकल्प पुढे नेणार आहोत, असे मंत्री म्हणाले.

जुने गोवे ग्रामपंचायतीचा विरोध कायम

जुने गोवेतील बांयगिणी येथे अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी सरकारने 1.71 लाख चौरस मीटर जागा आधीच संपादित केली आहे. तेथे संरक्षक भिंतही उभारण्यात आली आहे. त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच कचरा व्यवस्थापन विभागाने सदर घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासंबंधी जनतेकडून हरकती मागवल्या होत्या. परंतु या प्रकल्पाला बांयगिणी आणि ओल्ड गोवा येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला असून तो कायम आहे. तसेच कचरा प्रकल्पाचा प्रस्ताव रद्द करून सदर जमीन मनोरंजन प्रकल्प उभारण्यासाठी जुने गोवे ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात यावी, अशी विनंती केली होती.

Related Stories

स्वयंपूर्ण गोव्यासाठी भाजपला साथ द्या

Amit Kulkarni

सांगे, केपे तालुक्यांतील परीक्षा केंद्रांना भेटी

Amit Kulkarni

देवभूमी अंत्रुज नगरीत आजपासून देवीचा जागर

Amit Kulkarni

ऍड. खलप यांचा 5 रोजी नागरी सत्कार

Omkar B

खनिज वाहतुकीत दरवाढ मिळेपर्यंत ट्रक रस्त्यावर धावणार नाहीत !

Patil_p

रविवारपर्यंत वादळी वाऱयासह मुसळधार

Amit Kulkarni
error: Content is protected !!