Tarun Bharat

न्यायप्रविष्टगाळे वगळून उर्वरितांसाठी बोली

Advertisements

186 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी 11 पासून सलग 3 दिवस लिलाव प्रक्रिया : 46 गाळे न्यायप्रविष्ठ

प्रतिनिधी /बेळगाव

महापालिकेचे व्यापारी गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी आयोजित केलेल्या लिलाव प्रक्रियेला ब्रेक लागला होता. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसारच या लिलाव प्रक्रियेस पुन्हा प्रारंभ करण्यात येणार आहे. न्यायप्रविष्ट गाळे वगळता 186 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी दि. 11 जुलैपासून लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सलग तीन दिवस लिलाव प्रक्रिया करून 15 रोजी न्यायालयात याबाबतचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या 268 व्यापारी गाळय़ांच्या भाडे कराराची मुदत मार्च अखेरला संपली होती. त्यामुळे बारा वर्षांच्या कराराने गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी मे महिन्यात लिलाव प्रक्रिया आयोजित केली होती. पण पहिल्याच दिवशी लिलाव प्रक्रियेवेळी पूर्वीच्या भाडेकरूंना प्राधान्य देण्यात आले नसल्याची घटना घडली. महापालिकेच्या सूचनेनुसार लिलावापूर्वी गाळेधारकांनी महसूल विभागाकडे अर्ज देऊन गाळय़ाची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. तसेच लिलाव प्रक्रियेच्या तरतुदीनुसार लिलाव प्रक्रिया राबविल्यानंतर सदर गाळा पुन्हा आम्हालाच मंजूर करावा, अशी विनंती काही गाळेधारकांनी केली होती. मात्र गाळेधारकांच्या अर्जाकडे दुर्लक्ष करून नव्या बोलीधारकांना गाळे मंजूर करण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे गाळेधारकांनी या प्रक्रियेस आक्षेप घेतला होता.

काही गाळेधारकांनी थेट न्यायालयात धाव घेतली होती. काही गाळेधारकांनी स्थानिक न्यायालयात आणि काहींनी धारवाड उच्च न्यायालयात धाव घेऊन लिलाव प्रक्रियेला आक्षेप घेतला होता. महापालिकेने पूर्वसूचना न देता लिलाव प्रक्रिया राबविली असल्याचा आरोप करून लिलाव प्रक्रियेस स्थगिती मिळविली होती. त्यामुळे मे महिन्यात आयोजित केलेल्या लिलाव प्रक्रियेला बेक लागला होता.

न्यायालयाची परवानगी

त्यानंतर धारवाड उच्च न्यायालयात गाळेधारकांच्या याचिकेच्या सुनावणीस प्रारंभ झाला असता महापालिकेच्या वकिलांनी युक्तिवाद करून लिलाव प्रक्रिया राबविण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती. मात्र दोनवेळा ही सुनावणी लांबणीवर गेली होती. मागील आठवडय़ात झालेल्या सुनावणीवेळी लिलाव प्रक्रिया राबविण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती. पण न्यायालयात याचिका दाखल केलेल्या अर्जदारांचे गाळे वगळून उर्वरित गाळय़ांचा लिलाव करण्यास न्यायालयाने परवानगी दिली. तसेच ही लिलाव प्रक्रिया 15 दिवसांच्या आत पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे महापालिकेने न्यायप्रविष्ठ गाळय़ांची यादी केली होती. उर्वरित 186 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया आयोजित केली आहे. दि. 11 जुलैपासून या लिलाव प्रक्रियेस प्रारंभ होणार असून, दि. 11 व 13 असे तीन दिवस लिलाव प्रक्रिया चालणार आहे.

268 पैकी 31 गाळय़ांचा लिलाव यापूर्वी करण्यात आला होता. तर 46 गाळेधारकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे न्यायप्रविष्ठ गाळे वगळून 186 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी सलग 3 दिवस लिलाव आयोजित करण्यात आला आहे.

Related Stories

शेडबाळ-बेळगाव रेल्वेचा शुभारंभ

Patil_p

बसस्थानकातील भुयारी मार्गाचे काम हाती

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुक मराठी शाळा एसडीएमसी निवड

Amit Kulkarni

सज्जता नाताळ सणासाठीची

Patil_p

इंडस अल्टम इंटरनॅशनल स्कूल टॉप टेनमध्ये

Patil_p

आर्थिक धोरणाबाबत आरसीयुतर्फे चर्चासत्र

Patil_p
error: Content is protected !!