Tarun Bharat

भारतीयांना विशेष वागणूक दिल्याचा बायडेन प्रशासनावर आरोप

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांनी उमटविलेला ठसा जगजाहीर आहे. सुमारे 34 कोटी लोकसंख्येत केवळ 45 लाख भारतीय आहेत, तरीही भारतीय समुदाय अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांमध्ये विशेष स्थान मिळवून आहे. अमेरिकेतील मुख्य प्रसारमाध्यमे भारतीयांशी निगडित मुद्दय़ांचे प्रामुख्याने वृत्तांकन करत आहेत. दुसरीकडे भारतीयांना प्रसारमाध्यमांमध्ये विशेष स्थान मिळाल्याने अमेरिकेतील उजव्या विचारसरणीचा गट चिडला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन हे भारतीयांना विशेष वागणूक देत असल्याचा आरोप हा गट करतोय.

अमेरिकेतील अल्पसंख्याकांमध्ये भारतीय हा एकच असा समुदाय आहे, ज्याला मुख्य प्रवाहातील सीएनए, न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट यासारख्या मोठय़ा प्रसारमाध्यमांकडून मोठे स्थान मिळत आहे. भारतीयांच्या विरोधात होणाऱया गुन्हय़ांच्या वृत्तांकनाला या प्रसारमाध्यमांकडून प्राधान्य मिळत आहे. हा प्रकार अनिवासी भारतीयांच्या सामर्थ्याला दर्शविणारा आहे.

अमेरिकेत भारतीयांसाठी समर्पित वेबसाइट विशेष लोकप्रिय आहेत. भारतीयांना प्रभावित करणारे निर्णय, घटना आणि कार्यक्रमांचे या वेबसाइट्सकडून विस्तृतपणे वृत्तांकन करण्यात येते. अनिवासी भारतीयांची बदलती संस्कृती आणि जीवनशैलीचेही वृत्तांकन केले जाते. दर महिन्याला 20 लाखाहून अधिक लोक या वेबसाइट्सचा वापर करत आहेत.

Related Stories

आगुस्ता-वेस्टलँड प्रकणी अतिरिक्त आरोपपत्र

Patil_p

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी महिलांकडे

Omkar B

कॅप्टनच्या हॉकीने नाही खेळणार 6 उमेदवार

Patil_p

SBI चा रशियाला दणका; प्रतिबंधित संस्थांची केली आर्थिक कोंडी

datta jadhav

राजस्थानात विधासभा अधिवेशनास अनुमती

Patil_p

खासदारांचे निलंबन मागे घेण्यास व्यंकय्या नायडूंचा नकार

datta jadhav