कमला हॅरिसही सोबत जाण्याची शक्यता ः रशिया-युक्रेन युद्धाला 50 दिवस पूर्ण
@ वॉशिंग्टन, किव्ह / वृत्तसंस्था
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू होऊन 50 दिवस उलटले आहेत. हा संघर्ष काही दिवसातच कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात असताना युक्रेनच्या आक्रमक पवित्र्यामुळे रशियाला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले जात आहे. या युद्धाची धग दिवसेंदिवस तीव्र होत असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन नजिकच्या काळात युक्रेनचा दौरा करणार असल्याचे समजते. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युपेनसाठी 800 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची (सुमारे 6,089 कोटी रुपये) लष्करी मदत मंजूर केली आहे. रशियन हल्ल्याचा सामना करण्यासाठी देण्यात येणाऱया या मदतीत तोफखाना, लष्करी वाहने आणि लढाऊ हेलिकॉप्टरचा समावेश आहे.
रशिया-युपेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन लवकरच किव्हला भेट देऊ शकतात. सध्या व्हाईट हाऊसचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ पाठिंबा देण्यासाठी युक्रेनमध्ये जात आहे. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन किंवा उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस युपेनला जाण्याची शक्मयता आहे. यापूर्वी युद्ध कालावधीमध्ये ब्रिटन, युरोपियन युनियन, ऑस्ट्रिया, पोलंड या देशांच्या प्रमुखांनीही युपेनला भेट दिली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 9 एप्रिल रोजी किव्हला भेट दिली होती.
बायडेन-झेलेन्स्की समोरासमोर चर्चा
या दौऱयातून अमेरिकेला युपेनला उघड पाठिंबा देण्याचा विचार आहे. तसेच युपेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशीही यावेळी समोरासमोर चर्चा होऊ शकते. वृत्तानुसार, जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्याशिवाय अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन आणि संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन हेदेखील किव्हला भेट देण्याची शक्मयता आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. रशिया-युपेन युद्ध सुरू झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी पोलंडला भेट देत नाटोसह अमेरिकन सैन्याची भेट घेतली. मात्र, युक्रेनचा हा त्यांचा पहिलाच दौरा असेल.
अमेरिकेची युक्रेन ला सातत्याने मदत
युद्धाच्या काळात अमेरिकेकडून युपेनला सातत्याने मदत दिली जात आहे. नुकतीच अमेरिकेने युक्रेनला 800 दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केल्यानंतर अमेरिकेची एकूण मदत 3 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. दरम्यान, युपेनने काळय़ा समुद्रात रशियन युद्धनौका उद्ध्वस्त केल्या आहेत. काळय़ा समुद्राचे संरक्षण करणाऱया रशियन जहाजाचे नेपच्यून क्षेपणास्त्रांमुळे मोठे नुकसान झाले. मात्र, स्फोटापूर्वी जहाजातील सर्वांना बाहेर काढण्यात आल्याचा दावा रशियाने केला आहे.
युद्धात 50 दिवस लढल्याचा अभिमान ः झेलेन्स्की
रशियाने आम्हाला जास्तीत जास्त पाच दिवस दिलेले असतानाही या युद्धात 50 दिवस टिकून राहिल्याबद्दल आम्हाला अभिमान असल्याचे झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले आहे. 24 फेब्रुवारी हा दिवस लाखो युपेनियन लोकांसाठी बहुमूल्य आहे. या दिवशी रशियाची लढण्याचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे झेलेन्स्की यांनी व्हिडीओ संबोधनात म्हटले आहे. या युद्धात युपेन टिकेल की नाही याची खात्री नसताना जागतिक नेत्यांनी आपल्याला देश सोडण्याचा सल्ला दिला. पण युपेनियन किती शूर आहेत हे आम्ही जगाला दाखवून दिल्याचेही त्यांनी या संदेशात म्हटले आहे.