शस्त्रे आणि आर्थिक साहाय्याचे दिले आश्वासन
कीव्ह / वृत्तसंस्था
अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी सोमवारी अचानकपणे युक्रेनला भेट दिली आहे. गेल्या वर्षभरापासून रशियाने युक्रेनशी युद्ध पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानण्यात येत आहे. या भेटीची आधी घोषणा करण्यात आली नव्हती. रशियाने या भेटसंबंधी संताप व्यक्त केला आहे.
बायडेन यांनी विमानाऐवजी रेल्वेने प्रवास करुन युरोमधून युक्रेनची राजधानी कीव्हपर्यंतचे अंतर गाठले. यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. बायडेन यांनी युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांची भेट घेऊन त्यांच्याशी परिस्थितीसंबंधी चर्चा केली. त्यांनी युक्रेनसाठी आणखी 50 कोटी डॉलर्सचे शस्त्र आणि आर्थिक साहाय्य घोषित केले. तसेच अमेरिका आणि नाटो नेहमीच युक्रेनच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असतील असे वचन दिले. अमेरिकेने गेल्या वर्षभरात युक्रेनला शेकडो कोटी डॉलर्सची शस्त्रे पुरविली आहेत.
रशियाकडून नाराजी
बायडेन यांच्या युक्रेन भेटीवर रशियाने नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे युद्ध अधिक धारदार होईल. अमेरिका आणि नाटो यांचा रशिया विरोधक अलिकडच्या काळात अधिकच वाढला असून ही बाब शांततेसाठी घातक आहे, असा दावा रशियाने केला आहे. तर या युद्धात रशियाची पीछेहाट होत आहे. रशियाचे युद्ध जिंकण्याचे स्वप्न भंग पावले आहे. युक्रेनची टप्प्याटप्प्याने सरशी होत असून रशियाची प्रचंड मानवबळ आणि वित्तीय हानी झाली आहे, असा दावा युपेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांनी केला आहे. युद्धाला आता एक वषं पूर्ण झाले आहे. रशियाच्या सततच्या हल्ल्यानंतरही युपेनचा पाडाव झालेला नाही. तसेच या देशाची राजधानीं कीव्ह ही देखील सुरक्षित असून रशिया तेथपर्यंत पोहचू शकलेला नाही. सीमेवरील काही भागांमध्ये रशियाने घुसखोरी केली असली तरी ती युपेनच्या नीतीधैर्याला मोडून काढण्यात अयशस्वी ठरली आहे. रशियाला या युद्धात जिंकू दिले जाणार नाही, असा निर्धार झेलेन्स्की यांनी व्यक्त केला आहे.
चीनचे दुटप्पी वर्तन उघड
चीनमधील काही बिगर सरकारी संस्था रशियाला घातक शस्त्रांचा पुरवठा करीत आहेत. चीनचाच या पुरवठय़ामागे हात असून तो ही शस्त्रे अशा संस्थांच्या माध्यमातून रशियाला पुरवून स्वतः नामानिराळा राहू इच्छित आहे, असा आरोप युक्रेनकडून करण्यात आला. अम्।sरिकेचे विदेश व्यवहार मंत्री ब्लिंकन यांनीही चीनला अशी शस्त्रे रशियाला पुरविण्याविरोधात इशारा दिला आहे. चीनने मात्र या प्रकरणी कानावर हात ठेवले आहेत. तथापि, रशियाला छुप्या मार्गाने शस्त्रे पुरवून हे युद्ध जास्तीत जास्त काळ लांबयायचे आणि अमेरिका तसेच पाश्चिमात्य देशांची अधिक हानी अप्रत्यक्षरित्या घडवायची असा चीनचा डाव असल्याची टीका होत आहे. त्यामुळे युपेनमध्ये कोणती शस्त्रे रशियाकडून उपयोगात आणली जातात, याकडे अमेरिका आणि नाटो यांनीं बारकाईने लक्ष ठेवले आहे.