Tarun Bharat

Kolhapur; बिद्री ‘च्या सहवीज प्रकल्पाला राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

कारखान्याच्या तांत्रिक कार्यक्षमतेवर यशस्वी मोहोर

Advertisements

सरवडे / प्रतिनिधी

को- जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या सन २०२१ – २२ सालाकरीताचा सर्वोत्कृष्ट को – जनरेशन पॉवर प्लांटचा प्रथम क्रमांकाचा देश पातळीवरील पुरस्कार बिद्री ( ता.कागल ) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. या पुरस्काराने कारखान्याच्या शिरपेचात आणखी एका पुरस्काराची भर पडली असून कारखान्याच्या तांत्रिक कार्यक्षमतेवर यशस्वी मोहोर उमटली आहे.

को – जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने को- जनरेशन प्रकल्प राबविणाऱ्या आदर्शवत संस्थांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित केले जाते. सहकार क्षेत्रातील प्रकल्पांतर्गत बॉयलर ६७ किग्रॅ/ सेमी स्क्वेअर पेक्षा जास्त क्षमता गटामधून सन २०२१- २२ चा नॅशनल को-जनरेशन अॅवॉर्ड ‘बिद्री’ ला मिळाल्याचे महासंचालक संजय खताळ यांनी पत्राद्वारे कारखाना प्रशासनाला कळविले आहे.

येत्या २७ ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात को – जनरेशन असोसिएशनच्यावतीने कारखान्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. को-जन इंडियाचे अध्यक्ष व देशाचे माजी कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते परिवहन तथा राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय पातळीवरील हा पुरस्कार जाहीर झाल्याने कारखान्याचे संचालक मंडळ, प्रशासन व कोजन मॅनेजर व्ही. के. मिरजी, प्रोजेक्ट मॅनेजर महेश सलगर या सर्वांचे कारखाना कार्यक्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Related Stories

जुन्या झाडांना सेलीब्रिटी दर्जा द्या: अभिनेते सयाजी शिंदे

Abhijeet Shinde

व्हन्नूरजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Abhijeet Shinde

गिरणी कामगारांच्या पाठीशी महाविकास आघाडी – पालकमंत्री

Abhijeet Shinde

मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा करावी

Sumit Tambekar

वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली रद्द न झाल्यास आंदोलन छेडू – लखू खरवत

Ganeshprasad Gogate

रिक्षा व्यावसायिकांनी अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज भरावेत – पालकमंत्री

Abhijeet Shinde
error: Content is protected !!