Tarun Bharat

तूर्तास नवा पक्ष नाही, तीन महिन्यानंतर विचार: प्रशांत किशोर

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

तूर्तास नवा पक्ष स्थापन करण्याचा कोणताही विचार नाही. पण तीन महिन्यानंतर यावर विचार करेन. सध्यातरी संघटना बांधणीला प्राधान्य असेल. यासाठी २ ऑक्‍टोबर २०२२ रोजी बिहारमध्‍ये (bihar) ३ हजार किलोमीटर पदयात्रा काढली जाईल, अशी घोषणाही प्रशांत किशोर (prashant kishor) यांनी आज केली आहे.

काही दिवसांपूर्वी एक ट्‍विट करत प्रशांत किशोर यांनी राजकीय पक्ष (political party) स्‍थापन करण्‍याचे संकेत दिले होते. यासंदर्भात आज त्‍यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्‍पष्‍ट केली. सध्‍या तरी राजकीय पक्ष स्‍थापन करण्याचा कोणताही विचार नाही. पण तीन महिन्यानंतर यावर विचार करू. सध्या तरी संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित करणार असून १७ हजार नागरिकांशी संवाद साधणार आहे. तीन महिन्यांनंतर स्‍वतंत्र पक्ष स्‍थापन करण्‍याबाबत निर्णय झाला तरच राजकीय पक्ष स्‍थापन करेन, असे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्‍पष्‍ट केले. तर २ ऑक्‍टोबर २०२२ रोजी बिहारमध्‍ये ३ हजार किलोमीटर पदयात्रा काढणार असल्याची घोषणाही यावेळी प्रशांत किशोर यांनी केली आहे.

पुढे बोलताना प्रशांत किशोर म्हणाले. ” सध्या बिहारमध्‍ये निवडणूक होणार नाही. त्‍यामुळे सध्‍या तरी स्‍वतंत्र राजकीय पक्ष स्‍थापन करण्याचा कोणताही मानस नाही. पण मी १७ हजार नागरिकांशी संवाद साधेन. तीन महिन्यानंतर पक्ष स्थापनेवर विचार केला जाईल. त्या आधी संघटना बांधणीला प्राधान्य असेल. तसेच मी माझी भूमिका बिहारमधील नागरिकांसमोर मांडेन. तसेच हा केवळ माझा पक्ष असणार नाही. जो कोणी या पक्षात योगदान येईल, त्‍याचा हा पक्ष असेल”.

तीन हजार किलोमीटर पदयात्रा काढणार
राजकीय पक्ष स्‍थापन करण्‍यापूर्वी नागरिकांशी संवाद साधला जाईल. संघटना बांधणीला प्राधान्य असेल. यासाठी २ ऑक्‍टोबर २०२२ रोजी बिहारमध्‍ये ३ हजार किलोमीटर पदयात्रा काढणार आहे. यावेळी राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. माझी भूमिका मी जनतेसमोर ठेवणार आहे.

Related Stories

कॉम्प्युटर बाबाविरोधात कारवाई

Patil_p

महाराष्ट्र बँकेने घटवले गृहकर्ज व्याजदर

Patil_p

जवान विनय भोजे यांच्यावर तिळवणी येथे अंत्यसंस्कार

Sumit Tambekar

विक्रमी नोंद! महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर

Rohan_P

कर्नाटकात १८ हजार ४१२ सक्रिय रुग्ण

Abhijeet Shinde

मजुरांच्या घरवापसीसाठी राज्यांनी तोडगा काढावा

Patil_p
error: Content is protected !!