Tarun Bharat

गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा झटका

11 वेळचे आमदार राठवा यांचा पक्षाला रामराम ः भाजपमध्ये प्रवेश

@ वृत्तसंस्था / अहमदाबाद

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. छोटा उदयपूर  मतदारसंघाचे 11 वेळा आमदार राहिलेले मोहन सिंह राठवा यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. राठवा यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राठवा हे मागील काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज होते. यापूर्वी मे महिन्यात राठवा यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे म्हटले होते.

मोहन सिंह आता स्वतःचे पुत्र राजेंद्र सिंह राठवा यांना विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवून देऊ पाहत असल्याचे बोलले जात आहेत. राजेंद्र सिंह हे मागील काही काळापासून राजकारणात सक्रीय आहेत.

मागील 55 वर्षांपासून सातत्याने विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहे. गुजरातमध्ये नवे चेहरे आणि विशेषकरून तरुणाई राजकारणात यावी अशी माझी भावना आहे. कित्येक वर्षांपासून विधानसभा सदस्य राहिलेल्या नेत्यांनी आता आनंदाने तरुणाईसाठी मार्ग मोकळा करून द्यावा असे मोहन सिंह राठवा यांनी म्हटले हेते.

छोटा उदयपूर मतदारसंघात काँग्रेसचे राज्यसभा खासदार नारन राठवा यांनी स्वतःच्या पुत्राला उमेदवारी मिळवून देण्याचे प्रयत्न चालविले आहेत. आदिवासीबहुल छोटा उदयपूर मतदारसंघात काँग्रेसचे नेते मोहन सिंह राठवा, नारायण राठवा आणि सुखराम राठवा यांचेच वर्चस्व राहिले आहे. परंतु आगामी निवडणुकीत हे तिन्ही नेते एकाच पक्षात दिसून येणार नाहीत. 11 वेळा आमदार राहिलेले मोहन सिंह यांनी निवडणूक न लढविण्याची घोषणा केली आहे. तर माजी रेल्वे राज्यमंत्री नारायण राठवा सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. सुखराम राठवा हे गुजरातमध्ये काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत. सुखराम राठवा देखील निवडणूक लढविणार नसल्याची चर्चा आहे.

Related Stories

महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत वाढ कायम

Tousif Mujawar

उत्तर प्रदेशात पावसाचा कहर

Patil_p

कमर्शियल सिलिंडर दरात कपात

Patil_p

अग्नितांडवात होरपळत वाचवला तिरंगा

Patil_p

राज्यांना ‘म्युकरमायकोसिस’वरील औषधाच्या 23,680 वायल्स

datta jadhav

मतदारयादी दुरुस्तीनंतर काश्मीरमध्ये निवडणुका

Patil_p