पणजी / प्रतिनिधी
गोवा राज्यात काँग्रेसला फार मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे 11 पैकी 8 आमदार वेगळा गट स्थापन करून भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा गोव्याचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांनी बुधवारी सांगितले. भाजपकडे 20 तर कॉंग्रेसकडे 11 आमदार आहेत.
भाजपमध्ये प्रवेश करणारे सर्व आमदार सध्या गोवा विधानसभेत दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांच्याकडे आपले पत्र सादर करणार असून या आमदारात मायकल लोबो, दिगंबर कामत, दिलायला लोबो, राजेश फळदेसाई, रुदलफ फर्नांडिस, अलेक्स सीकवेरा, केदार नाईक, संकल्प आमोणकर यांचा समावेश आहे