Rahul Gandhi कॉंग्रेससह राहूल गांधींना संसदेतील लोकसभा सचिवालयाने मोठा धक्का दिला आहे. कालच गुजरातमधील सुरत न्यायालयाने मोदी (Modi) या आडनावावरून बदनामी केल्याचा आरोप ठेऊन दोन वर्षाची शिक्षा केली ठोठावली आहे. न्यायालयाच्य़ा या निकालानंतर लोकसभा सचिवालयाने दोन वर्षाची शिक्षा झालेल्या लोकसभा सदस्याची खासदारकी रद्द होते य़ा नियमाखाली राहूल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली.
कर्नाटकातील कोल्लार येथे 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राहूल गांधी मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी देशातील सर्व चोरांचे मोदी हेच आडनाव कसे काय? असा प्रश्न विचारला होता. राहूल गांधी यांच्या वक्तव्याविरोधान गुजरातमधील भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहूल गांधी यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर सुरत न्यायालयाने राहूल गांधी यांच्याविरोधात खटला चालवून काल त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. शिक्षेनंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला करून उच्च न्यायालयात अपील करण्यास 30 दिवसांची शिक्षा स्थगित केली होती.
दरम्यान, लोकसभेतील संसदीय सचिवालयाने या शिक्षेला गांभिर्यांने घेतली. संसदेच्या नोटीसमध्ये आज राहूल गांधी यांची खासदारकी रद्दबातल केल्याचे म्हटले आहे.