Tarun Bharat

स्वातंत्र्यदिनापूर्वी हल्ल्याचा मोठा कट उघड

Advertisements

वेगवेगळय़ा भागातून संशयित हल्लेखोर ताब्यात ः दिल्लीत 2 बांगलादेशींना अटक ः पंजाबमध्ये चौघे जेरबंद

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

स्वातंत्र्यदिनापूर्वी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी रविवारी दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. तसेच पंजाब, आसाम, कर्नाटक येथेही काही संशयित दहशतवाद्यांना रंगेहाथ पकडून मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे स्वातंत्र्यदिन सोहळय़ादरम्यान कुरापती काढण्याचे दहशतवादी संघटनांचे इरादे फसले आहेत.

दिल्लीतील कारवाईत पोलिसांनी संशयित दहशतवाद्यांच्या ताब्यातून अनेक पासपोर्ट आणि बांगलादेश मंत्रालयाचे 10 बनावट शिक्के जप्त केले आहेत. मोहम्मद मुस्तफा आणि मोहम्मद हुसैन अशी पालम परिसरातून रविवारी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांची चौकशी सुरू असून त्यांच्या साथीदारांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी आनंद विहार परिसरातून शस्त्र तस्करी करणाऱया टोळीतील 6 जणांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 2250 जिवंत काडतुसांसह मोठय़ा प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. हा गुन्हेगारी नेटवर्कचा भाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पंजाबमध्येही दहशतवादी मॉडय़ूलचा पर्दाफाश

पंजाब पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने रविवारी पाक-आयएसआय समर्थित दहशतवादी मॉडय़ूलचा पर्दाफाश केला. कॅनडास्थित अर्श डल्ला आणि ऑस्ट्रेलियातील गुरजंत सिंग यांच्याशी संबंधित चार मॉडय़ूल सदस्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 3 ग्रेनेड, एक आयईडी, दोन 9 एमएम पिस्तूल आणि 40 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

आसाम, मणिपूरमध्ये मोठी कारवाई

मणिपूरमध्ये प्रतिबंधित पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) च्या सात सशस्त्र दहशतवाद्यांना मणिपूरच्या विविध भागातून अटक करण्यात आली आहे. तसेच आसाममध्ये चरैदेव जिल्हय़ात उल्फा (आय) कॅडरला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. आसाम रायफल्सला गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याशिवाय प्रतिबंधित पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सात दहशतवाद्यांना मणिपूरच्या विविध भागांतून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पिस्तूल, ग्रेनेड आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. इम्फाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, ककचिंग आणि थौबल जिह्यात अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. यादरम्यान एका अल्पवयीन व्यक्तीला शस्त्रे आणि स्फोटकांसह पकडण्यात आले आहे.

Related Stories

टिक टॉक वर लाईक्स न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

prashant_c

दिलासादायक : दिल्लीतील 14 लाख 161 रुग्ण कोविडमुक्त!

Rohan_P

मेरठमध्ये नव्या स्ट्रेनचे आणखी 4 रुग्ण

datta jadhav

भाजप राज्य प्रभारींची 27 सप्टेंबरला बैठक

Patil_p

कुलगाम चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

36 केंद्रीय मंत्री भ्याड : मणिशंकर अय्यर

Patil_p
error: Content is protected !!