Tarun Bharat

‘या’ विद्यार्थ्याना परीक्षेला मुकावे लागणार,दहावी बारावीच्या परीक्षांपूर्वी बोर्डाचा मोठा निर्णय

SSC-HSC Exam : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षांपूर्वी बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश देऊ नये असे आदेश केंद्रांना दिले आहेत. उशीरा येण्याच्या सवलतीचा लाभ घेऊन लेखी परीक्षेस उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

याआधी अपवादात्मक परिस्थितीत १० मिनिटे उशीर झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात होता. मात्र, आता उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात यावा असे आदेश बोर्डाने परीक्षा केंद्रांना दिले आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे पेपरला मुकावे लागू शकते.

येत्या २१ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ दरम्यान, दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत . ही परीक्षा सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अर्धा तास आधी केंद्रावर हजर राहणे अनिवार्य असणार आहे. गतवर्षी कोरोना प्रार्दुभावामुळे काही प्रमाणात सुट देण्यात आली होती. मात्र यावर्षी होम सेंटर पद्धत बंद करण्यात आली आहे. तसेच दहावी- बारावी परीक्षेत यंदा बैठे पथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहणार आहे.

Related Stories

मोदींना उद्देशून ममतादीदींची वादग्रस्त टिप्पणी

Patil_p

प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्याकडे तक्रार दाखल मनसेचे राहूल पवार

Patil_p

सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवणाऱ्या दुकानांवर पालिकेचा दंडुका

Archana Banage

श्री सेवागिरी रथावर 30 लाख 56 हजार देणगी जमा

Patil_p

‘फक्त हिंदूंसाठी’ जाहिरातीने तामिळनाडूत वाद

Patil_p

गडहिंग्जल तालुक्यातील 25 गावांची `हद्द’ निश्चित

Archana Banage