ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अर्थमंत्री निर्मला सितारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पापूर्वीच शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. सुरूवातीच्या सत्रापासूनच सेन्सेक्ससह निफ्टीने उसळी घेतली आहे. सकाळी 9 वाजता शेअर बाजार उघडताच बीएसईचा सेन्सेक्स 451.27 अंकांच्या उसळीसह 60,001.17 वर तर निफ्टी 17811 वर उघडला.
सध्या बीएसईचा सेन्सेक्स 575.66 च्या वाढीसह 60,125.15 वर व्यवहार करत आहे. निफ्टी देखील 156.95 च्या वाढीसह 17,819.10 वर व्यवहार करत आहे. मिड, स्मॉलकॅप शेअर्समध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सध्या मार्केटमधील स्थिती सकारात्मक असल्याचं दिसते. शेअर बाजारात अर्थसंकल्पाच्या दिवशी नेमकं कसं वातावरण असणार, याची चिंता गुंतवणूकदारांना लागली आहे. काल सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात काही सकारात्मक बाबी समोर आल्याने बाजारात तेजी दिसून येत आहे.
अधिक वाचा : अर्थसंकल्पासाठी अधिकारी असतात 10 दिवस बंदिवासात