Tarun Bharat

घाऊक किंमत निर्देशांकात मोठी वाढ

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

घाऊक महागाई दरात मे महिन्यात मोठी वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये हा दर 15.08 टक्के इतका होता. तर मे मध्ये तो 15.88 टक्क्यांवर पोहचला आहे. घाऊक महागाई दर 10 टक्क्यांहून अधिक राहण्याचा हा सलग 14 वा महिना आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात निर्देशांक 13.11 टक्के होता. किरकोळ किंमतवाढ दराने मात्र मे महिन्यात किंचितसा दिलासा दिला आहे.

मे मध्ये केवळ उत्पादित वस्तूक्षेत्रात दरवाढ घसरली आहे. इतर सर्व क्षेत्रांमध्ये महागाई वाढलेलीच आहे. स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ 38.5 टक्क्यांवरुन 47.7 टक्क्यांवर पोहचली आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेल महागाईवाढीला काहीसा लगाम बसला आहे. खनीज तेले, पेट्रोलियम, अन्नधान्ये आणि खाद्यतेले यांच्या वाढलेल्या दरांमुळे घाऊक महागाई निर्देशांवर विपरीत परिणाम झाला आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे भाज्या आणि फळे यांचे दर वाढले. डाळीही महाग झाल्या. रासायनिक पदार्थ आणि त्यांच्यापासून तयार केलेली उत्पादने यांच्याही दरात वाढ झाली. परिणामी महागाई निर्देशांक वाढल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले.

जागतिक बाजारात कच्च्या इंधन तेलाच्या दरात झालेली अचानक वाढ हे घाऊक महागाई निर्देशांकात वाढ होण्याचे प्रमुख कारण आहे. नजीकच्या भविष्यकाळात तेलदरावर लक्ष ठेवावे लागणार आहे, असा इशारा तज्ञांनी दिला.

Related Stories

नीट पीजी परीक्षा २०२२ पुढे ढकलण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

Abhijeet Shinde

कोरोना : जम्मू काश्मीरमध्ये 133 नवे रुग्ण; 419 जणांना डिस्चार्ज

Rohan_P

उत्तरप्रदेशमधील सामूहिक बलात्कार पीडितेचा मृत्यू

Patil_p

घातक फटाक्यांसाठी अधिकारी जबाबदार ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Abhijeet Shinde

‘कोवॅक्सिन’च्या उत्पादनासाठी हाफकिनला 159 कोटींचे अनुदान

datta jadhav

…तर हे पाऊल भारताला चुकीच्या वळणावर नेणार – अमेरिका

Sumit Tambekar
error: Content is protected !!