युवतीने प्राण्यांसाठी सोडली 60 लाखांची नोकरी
घरात प्राणी आणि पक्षी पाळण्याचा छंद काही नवी गोष्ट नाही. परंतु एका युवतीने प्राण्यांशी बोलण्यासाठी स्वतःची 60 लाख रुपयांचा पगार असलेली नोकरी सोडली आहे. अमेरिकेतील या युवतीने प्राण्यांशी बोलण्यासाठी स्वतःची नोकरी सोडली. प्राण्यांशी बोलण्यासाठी ती 1 तासाकरता सुमारे 30 हजार रुपयांचे शुल्क आकारते आणि पूर्वीपेक्षा अधिक कमाई करत आहे.
फिलाडेल्फिया येथील रहिवासी 33 वर्षीय निक्की वास्कोनेजो यापूर्वी एका पूर्णवेळ प्रॉपर्टी लॉयर होती. परंतु त्या कामात तिला आनंद मिळत नव्हता. याचमुळे तिने स्वतःचे ड्रीम करियर ‘ऍनिमल सायकिक’साठी जुने काम सोडले आणि प्राण्यांशी बोलण्याची पद्धत शिकू लागली. त्यानंतर ती स्वतःच्या सेवेबद्दल फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकद्वारे प्रचार करू लागली. लवकरच तिला एकाचवेळी एक महिन्याचे बुकिंग मिळाले.
प्राण्यांशी छायाचित्रे पाहून…
निक्की प्राण्यांची छायाचित्रे पाहून आणि त्यांच्याशी टेलिपॅथिक पद्धतीने प्रश्न विचारून त्यांच्याशी बोलत असल्याचा दावा करते. ज्यानंतर ती प्राण्यांच्या मालकाला फोनवर पूर्ण संभाषणाबद्दल माहिती देते. निक्कीला पाळीव प्राण्याचे नाव, लिंग आणि घरातील सदस्यांची नावे पूर्वीच द्यावी लागतात. निक्की आता इतर लोकांनाही स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचा सल्ला देत आहे. मला जे आवडते तसेच काम मी करत असल्याचे ती सांगते.
प्रारंभिक काळात उडविली खिल्ली पूर्वीच्या कामामुळे (प्रॉपर्टी लॉयर) मी अत्यंत त्रस्त राहत होते. नव्या कामावरून अनेकदा माझी खिल्ली उडविण्यात आली. प्रारंभिक काळात कुटुंबीय आणि मित्रांच्या पाळीव प्राण्यांवर सराव करत होते, परंतु सोशल मीडियावर अकौंट सुरू करताच माझी फॉलोइंग वाढू लागली. लवकरच मला रिक्वेस्ट्स मिळू लागल्याचे ती सांगते. निक्की प्राण्यांच्या देहबोलीच्या आधारावर त्यांच्याशी संवाद साधत असते. निक्कीला तिच्या कामासाठी टिकटॉकवर अनेक जण संपर्क साधत असतात.