Tarun Bharat

रशियाविरोधात युरोपीय महासंघाचे मोठे पाऊल

Advertisements

दहशतवादाचा पुरस्कर्ता देश घोषित ः युक्रेनवरील हल्ल्यांचा दिला दाखला

वृत्तसंस्था / स्ट्रासबर्ग

युरोपीय महासंघाने रशियाला ‘दहशतवादाचा पुरस्कृर्ता देश’ घोषित केले आहे. रशियाच्या सैन्याने ऊर्जानिर्मिती केंद्रे, रुग्णालये, शाळा आणि निवाऱयाच्या ठिकाणांवर हल्ले करत आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केले आहे. युक्रेनवरील हल्ले म्हणजे क्रूर आणि अमानवीय कृत्य असल्याचे युरोपीय महासंघाने म्हटले आहे.

रशियाने जाणूनबुजून युक्रेनच्या नागरिकांवर हल्ले करत अत्याचार केले आहेत. रशियाने नागरी सुविधांचा विनाश, मानवाधिकारांचे गंभीर उल्लंघन आणि आंतरराष्ट्रीय मानवीय कायद्यांच्या विरोधात जात युद्धगुन्हे गेले आहेत. हे कृत्य दहशतवादी कृत्यासमार असल्याचे युरोपीय संसदेच्या सदस्यांनी म्हटले आहे.

फ्रान्सच्या स्ट्रासबर्गमध्ये झालेल्या अधिवेशनात बुधवारी रशियाविरोधी प्रस्तावाच्या बाजूने 494 मते पडली. तर या प्रस्तावाच्या विरोधात 58 सदस्यांनी मतदान केले आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेन्स्की यांनी ट्विट करत या निर्णयाचे स्वागत केले आहे. युरोपीय संसदेकडून रशियाला दहशतवादाचा पुरस्कर्ता देश म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. रशियाला सर्वच स्तरांवर एकाकी पाडले जावे. युक्रेन आणि जगभरातील दहशतवादासाठी रशियाला उत्तरदायी ठरविण्यात यावे असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

युरोपीय संसदेचे प्रस्ताव हे कायदेशीरदृष्टय़ा बंधनकारक नाहीत. युरोपीय महासंघाचे हे पाऊल बऱयाचअंशी प्रतिकात्मक आहे, कारण युरोपीय महासंघाकडे याचे समर्थन करण्यासाठी कुठलीच कायदेशीर व्यवस्था नाही. पाश्चिमात्य देशांनी रशियावर यापूर्वीच कठोर निर्बंध लादले आहेत.

Related Stories

अमेरिकेत संक्रमण धोकादायक

Omkar B

रावणाने 5 हजार वर्षापूर्वी केले पहिले विमान उड्डाण; श्रीलंकेचा दावा

datta jadhav

ढाका येथील नदीत नौका बुडाली, 28 बळी

Patil_p

अमेरिका : 2 लाख रुग्ण

Patil_p

22 मुलांच्या आईची भन्नाट ट्रिक

Patil_p

‘रॉ’ प्रमुखांच्या भेटीने नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली वादात

datta jadhav
error: Content is protected !!