Tarun Bharat

बिहारचे कृषीमंत्री सुधाकर सिंह यांचा तडकाफडकी राजीनामा

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

Bihar Agriculture Minister Sudhakar Singh resigns तांदुळ घोटाळ्याचे आरोप असलेले बिहार सरकारमधील कृषीमंत्री सुधाकर सिंह यांनी तडकाफडकी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

सुधाकर सिंह हे बिहार आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांचे पुत्र आहेत. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाआघाडी सरकारमध्ये आरजेडी कोटय़ातून सुधाकर सिंह यांना कृषीमंत्रीपद देण्यात आले होते. बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या होते. नवे कायदामंत्री आणि आरजेडी नेते कार्तिकेय सिंह यांच्यानंतर आता विरोधी पक्ष भाजप नवे कृषिमंत्री सुधाकर सिंह यांच्याबाबत आक्रमक झाला आहे. सुधाकर सिंह यांच्यावर तांदूळ घोटाळय़ाचा आरोप आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे तांदूळ घोटाळय़ात सुधाकर सिंह यांच्यावर खटला दाखल करणारे सरकार दुसरे तिसरे कोणी नसून नितीश कुमार यांचे सरकार होते. त्यामुळे आता नितीश कुमार या प्रकरणाला कसे सामोरे जातात ते पाहावे लागेल.

अधिक वाचा : ज्येष्ठ कथक नृत्यगुरू शरदिनी गोळे यांचे निधन

सुधाकर सिंह यांनी खुल्या व्यासपीठावरून बिहार सरकारच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना चोर म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून बराच गदारोळ झाला होता.

Related Stories

69 हजार शिक्षक भरती प्रकरणाचा खुलासा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली

Tousif Mujawar

राजस्थान-गुजरातमार्गे घुसखोरीचा पाकचा कट

Patil_p

इटीएफमध्ये 4,814 कोटी रुपयांची गुंतवणूक

Patil_p

दिलासादायक : जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 1399 रुग्णांना डिस्चार्ज

Tousif Mujawar

धोका वाढला : पंजाबमध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 2.20 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

पुलवामात ‘जैश’च्या मॉड्यूलचा पर्दाफाश

datta jadhav
error: Content is protected !!