Tarun Bharat

बिहारमध्ये राजकीय उलथापालथ! एमआयएमचे ४ आमदार RJD मध्ये

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

महाराष्ट्रात बंडखोरीचं नाट्य गेल्या आठ दहा दिवसांपासून सुरू असताना बिहारमध्ये राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांना मोठा धक्का बसला आहे. एमआयएमचे पाच पैकी चार आमदार आरजेडीमध्ये (RJD) गेले आहेत. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष अख्तरुल ईमान वगळता इतर चार आमदारांनी पक्ष सोडला आहे. सर्व आमदार बुधवारी आरजेडी नेते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांच्यासोबत विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला गेले आहेत.

महाराष्ट्रात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असताना दुसरीकडे बिहारमध्येही राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे. एमआयएमच्या ४ आमदारांनी आरजेडीमध्ये प्रवेश केल्याने ओवैसीच्या पक्षाला खिंडार पाडलं आहे. विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे ५ आमदार जिंकले होते. यातील चार आमदारांनी आता एमआएममधून बाहेर पडत आरजेडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शाहनवाज, मोहम्मद अनजर नीमी, मोहम्मद इजहार असफी, सय्यद रुकनुद्दीन आमदारांची नावे आहेत.

ओवैसी यांच्या पक्षला खिंडार पडल्यानं भाजपला धक्का बसला आहे. आरजेडी बिहार विधानसभेत सर्वात मोठा पक्ष बनला आहे. बिहारमध्ये सध्या विधानसभेत आरजेडीचे ८०, भाजपचे ७७, जेडीयूचे ४५, काँग्रेसचे १९, डाव्यांचे १६, आणि इतर सहा आमदार आहेत.

Related Stories

पंतप्रधान कांदा, टोमॅटो आणि पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी आलेले नाहीत तर…; वाढत्या महागाईवरून भाजप प्रवक्त्याचं अजब वक्तव्य

Abhijeet Shinde

चारा घोटाळा : लालू प्रसाद यादव यांना सशर्त जामीन मंजूर

Rohan_P

बहुतांश राज्ये आता ‘अनलॉक’कडे!

Patil_p

उद्या पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास राज्यांनी हत्यारं विकत घ्यावी का ? ; अरविंद केजरीवालांचा संतप्त सवाल

Abhijeet Shinde

किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी सुरु ठेवण्याचा विचार – राजेश टोपे

Abhijeet Shinde

नितीन गडकरींची मोठी घोषणा ; महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी २७८० कोटी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!