वार्ताहर /किणये
बिजगर्णी व होंनहट्टी येथे गवतगंजीला आग लागून गवत जळून खाक झाल्याया घटना घडल्या. बिजगर्णीत आग लागण्याचा प्रकार सोमवारी दुपारी अडीचच्या दरम्यान घडला. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. मात्र गावातील एका शेतकऱयाचा जनावरांसाठी ठेवलेला पा ट्रॉली सुका चारा जळाल्याने इतर शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. देवाप्पा मारुती पाटील यांनी जनावरांसाठी पिंजर गवताची गंजी घरापासून काही अंतरावर ठेवली होती. सोमवारी दुपारी अचानक या गवत गंजीला आग लागली. कडक उन्हाची वेळ असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. गावातील नागरिकांनी बाजूलाच असलेल्या विहिरीचे पाणी ओतून, केळीची झाडे टाकून व झाडाच्या फांद्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीत पाच ट्रक्टर ट्रॉली गवत जळून खाक झाले आहे. यामुळे देवाप्पा पाटील यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर व इतर पंचमंडळींनी भेट देऊन पाहणी केली आहे.
हुंचेनहट्टीत शॉर्टसर्कीटमुळे गवतगंजीला आग
हुंचेनहट्टी येथे विद्युतभारित ताराया स्पर्शामुळे शॉर्टसर्किट होऊन गवतगंजीला आग लागली. या आगीत तीन ट्रक्टर ट्रॉली गवत जळून खाक झाले. आग सोमवारी दुपारी एकच्या दरम्यान लागली. मारुती गल्ली, हुंचेनहट्टी येथील रामा बाबू बस्तवाडकर यांनी आपल्या घराच्या पाठीमागील शेतात गवतगंजी ठेवली होती. या गवतगंजी जवळून विद्युतभारित तारा गेल्या आहेत. सोमवारी दुपारी विद्युतभारित तारेचा स्पर्श होऊन शॉर्टसर्किट झाले आणि गवतगंजीला आग लागली, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. आगीत विद्युततारही तुटून पडली होती. तीन ट्रक्टर ट्रॉली गवत जळून खाक झाल्यामुळे रामा बस्तवाडकर यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र निष्फळ ठरले. हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे एका शेतकऱया सुका चारा जळाल्यामुळे शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱयाला भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आह